Maharashtra State Drama Festival : राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा

Maharashtra State Drama Festival : राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा

0
Maharashtra State Drama Festival : राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा
Maharashtra State Drama Festival : राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा

स्थानिक हौशी कलाकारांना अधिक संधी

Maharashtra State Drama Festival : महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत (Maharashtra State Drama Festival) आयोजित करण्यात येणाऱ्या हौशी नाट्य स्पर्धांमध्ये स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने स्पर्धेच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य ॲड. आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे स्थानिक हौशी कलाकारांचे स्पर्धेतील हक्काचे व्यासपीठ अधिक सक्षम होणार आहे.

स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक

महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य तसेच दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे आयोजन राज्यातील २४ केंद्रांवर करण्यात येते. नव्याने करण्यात आलेल्या नियमावलीतील सुधारणेनुसार, स्पर्धेत सहभागी होणारा कलाकार संबंधित स्पर्धा केंद्राच्या जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पारितोषिकांच्या रकमेत वाढ (Maharashtra State Drama Festival)

गेल्या काही वर्षांत शासनाने हौशी नाट्य स्पर्धांमधील पारितोषिकांच्या रकमेत लक्षणीय वाढ केली आहे. त्यानंतर काही ठिकाणी परजिल्ह्यातील कलाकार स्थानिक नाट्यसंस्थांच्या माध्यमातून अन्य केंद्रांवर सहभागी होत असल्याच्या तक्रारी सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. परिणामी, संबंधित जिल्ह्यातील स्थानिक हौशी कलाकारांच्या सहभागाच्या संधींवर मर्यादा येत असल्याचे निदर्शनास आले होते.

या संदर्भात हौशी कलाकार व हौशी नाट्यसंस्थांकडून प्राप्त झालेल्या सूचना आणि तक्रारींची दखल घेऊन मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य ॲड. आशिष शेलार यांनी स्थानिक कलाकारांच्या हिताला प्राधान्य देत स्पर्धेच्या नियमावलीत आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामागे ग्रामीण व शहरी भागांतील स्थानिक नाट्यसंस्थांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक कलाकारांना स्पर्धांमध्ये अधिक संधी मिळवून देणे तसेच नवोदित हौशी कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, हा प्रमुख उद्देश आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या हौशी नाट्यसंस्था व स्थानिक कलाकारांना अधिक व्यापक संधी उपलब्ध होणार असून, हौशी रंगभूमीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका दि. 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यातील जास्तीत जास्त हौशी कलाकार व हौशी नाट्यसंस्थांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्री. प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.