Anna Hazare : विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची आस्थेने केली विचारपूस

Anna Hazare : विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची आस्थेने केली विचारपूस

0

Anna Hazare : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde) यांनी आज मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून तसेच संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.

आरोग्याची विशेष काळजी घेण्याची भावना व्यक्त

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी प्रा. राम शिंदे यांनी सदिच्छा व्यक्त केली. अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करताना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अण्णा हजारे हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान (Anna Hazare)

समाजहित आणि देशहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे अण्णा हजारे हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. ग्रामविकास, सामाजिक प्रबोधन, भ्रष्टाचारविरोधी लढा, स्वच्छता आणि लोकसहभागाच्या माध्यमातून त्यांनी समाजजीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. निःस्वार्थ सेवाभाव, साधी जीवनशैली, संघर्षाची वृत्ती आणि समाजहितासाठीची त्यांची अविरत धडपड ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे हा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा क्षण असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

अण्णांचे विचार, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे समाजासाठी कार्य करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. त्यांच्या कार्यातून समाजासाठी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ भावनेने काम करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.