
Action taken by the City Traffic Branch : नगर : अहिल्यानगर शहरातील दाळमंडई–आडतेबाजार परिसरात वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात (Undisciplined Motorists) शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा (Action taken by the City Traffic Branch) बडगा उगारला. सार्वजनिक रस्त्यावर मालवाहतूक वाहने उभी करून रस्ता अडविणे, वाकडी-तिकडी वाहने लावून वाहतुकीचा खोळंबा करणे तसेच नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात चार लाख २६ हजार असंकलित मतदार; सुनिल गाढे यांची माहिती
यांनी केली ही कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या आदेशानुसार, वाहतूक पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद मन्सूर व पोलीस कॉन्स्टेबल अनिल आव्हारे यांनी ही कारवाई केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शिस्त लावण्यासाठी कारवाई(Action taken by the City Traffic Branch)
दाळमंडई–आडतेबाजार परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्तपणे वाकडी- तिकडी वाहने उभी करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्यांनावर यापुढे कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला आहे.


