
Action against sand smugglers : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा (Action against sand smugglers) व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. श्रीरामपूर तालुका आणि राहाता पोलिस ठाण्याच्या (Rahata Police Station) हद्दीत १ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत पोलिसांनी चार जणांविरुद्ध पाच गुन्हे दाखल केले असून, सुमारे २० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे
रोमन सलीम पठाण (वय २२, रा. सम्राटनगर, श्रीरामपूर), जावेद नजीर शेख (वय ३७, रा. पुणतांबा, ता. राहाता), आणि फरियाद उर्फ गुड्डू फिरोज शेख (वय २८, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता), आकाश परदेशी, असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अवैध वाळू उपसा व वाहतुकीची माहिती घेऊन कारवाई (Action against sand smugglers)
जिल्हात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार पथकाने १ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका आणि राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळवून दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात रोमन सलीम पठाण (वय २२, रा. सम्राटनगर, श्रीरामपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, आकाश परदेशी (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही, रा. आदर्शनगर, वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात जावेद नजीर शेख (वय ३७, रा. पुणतांबा, ता. राहाता) आणि फरियाद उर्फ गुड्डू फिरोज शेख (वय २८, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि सतीष भवर यांच्या पथकाने केली.


