Voter List : अहिल्यानगर जिल्ह्यात चार लाख २६ हजार असंकलित मतदार; सुनिल गाढे यांची माहिती  

Voter List : अहिल्यानगर जिल्ह्यात चार लाख २६ हजार असंकलित मतदार; सुनिल गाढे यांची माहिती  

0
Voter List : अहिल्यानगर जिल्ह्यात चार लाख २६ हजार असंकलित मतदार; सुनिल गाढे यांची माहिती  
Voter List : अहिल्यानगर जिल्ह्यात चार लाख २६ हजार असंकलित मतदार; सुनिल गाढे यांची माहिती  

Voter List : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी (Voter List) आज (ता. ३१) प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या मतदार यादी पडताळणीत (Voter List Verification) अहिल्यानगर जिल्ह्यात ३८ लाख १० हजार मतदारांपैकी चार लाख २६ हजार ९३० मतदार मयत, दुबार किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित (असंकलित मतदार) आढळून आले असून, मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना आक्षेप नोंदविता येणार आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनिल गाढे यांनी दिली.

विधानसभा निहाय मतदारांची संख्या खालील प्रमाणे

यावेळी, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ३३ लाख ८३ हजार १८७ पात्र मतदारांची प्रारूप मतदार यादीतील विधानसभा निहाय मतदारांची संख्या खालील प्रमाणे

अकोले- २,५२,२५१
संगमनेर- २,६३,११४
शिर्डी- २,५३,५४४
कोपरगाव- २,५०,०७६
श्रीरामपूर- २,७४,७२६
नेवासा- २,६५,३८९
शेवगाव- ३,३५,५५७
राहुरी- २,९५,६७२
पारनेर- ३,१९,६०९
नगर शहर- २,४६,४२४
श्रीगोंदा- ३,०८,११६
कर्जत- जामखेड- ३,१८,७०९

मतदार यादीत समाविष्ट नाहीत त्यांची संख्या (Voter List)

तसेच मयत, दुबार किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित (असंकलित मतदार) व ज्यांनी अर्ज आणि कागदपत्रे ‘बीएलओ’कडे जमा केलेले नाही अशा चार लाख २६ हजार ९३०  मतदारांची नावे ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत समाविष्ट असणार नाहीत त्यांची संख्या खालील प्रमाणे

मयत मतदार- १,४१,२१२
गैरहजर- ५०,१६७
कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार- १,७१,७१९
इतर मतदार- १,१२५
यापूर्वीच नोंदणी झालेले मतदार- ६२,७०७

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यांचे निराकरण २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येईल. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. आयोगाने दिलेल्या ceo.maharashtra.gov.in व voters.eci.gov.in या वेबसाईटवर आपले नाव मतदार यादीत बघता येणार आहे. तसेच ‘बीएलओ’कडूनही याची माहिती घेता येईल.

मतदार यादीत जुळणी न झालेले व मतदाराच्या मजकुरात विसंगती असलेल्या मतदारांना नोटीस पाठविण्यात येणार आहेत. तसेच सुनावणीकरिता मतदारांना जास्त अंतर चालावे लागणार नाही या दृष्टीने गावपातळीवर अथवा मंडळस्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सुनावणीचे नियोजन करण्यात येणार आहे. सुनावणी दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी मनीषा राशीनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कक्ष तयार करण्यात आला आहे. 

तालुकास्तरावर समन्वयासाठी तालुकास्तरीय अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचा मिळून एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. असंकलित मतदारांचे (मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित) आवश्यक ते रेकॉर्ड बीएलओंनी जतन करून ठेवावे तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर एखाद्या मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत नसल्यास त्यांनी आवश्यकतेनुसार नमुना ६ किंवा ८ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यासह भरून द्यावे.

आढळून आलेल्या मतदारांची ४३६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत बीएलओंच्या सहकार्याने सुनावणी घेण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास विशेषतः शहरी भागात सुनावणीच्या नोटीस व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे देखील बजावण्यात येणार आहेत, असे जिल्हा निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विशाल सदनापूर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here