Case Registered : आजारी वृध्दाचे अपहरण करून मालमत्ता हडपली; वकिलासह ८ जणांवर गुन्हा दाखल

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Case Registered : आजारी वृध्दाचे अपहरण करून मालमत्ता हडपली; वकिलासह ८ जणांवर गुन्हा दाखल
Case Registered : आजारी वृध्दाचे अपहरण करून मालमत्ता हडपली; वकिलासह ८ जणांवर गुन्हा दाखल

Case Registered : नगर : आजारी वयोवृद्धाच्या घरातून बळजबरीने अपहरण (Kidnapping) करून त्यांची स्थावर मालमत्ता, वाहन, दागिने आणि बँकेतील रोख रक्कम असा कोट्यवधींचा ऐवज लाटल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुरेश गणेश चितांबर (वय ७५, सध्या रा. पुणे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वकील तेजस्वी कुलकर्णी-तवले, मेधा महेशकुमार यादव, रंजना मारुती झिने, प्रवीण बबन बारस्कर, सचिन बबन बारस्कर, महेश गोविंद्र पवार, ज्ञानेश्वर रवींद्र सोनार आणि एका अज्ञात इसमावर विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : गणेशोत्सवात डीजे बंदी? आमदार जगताप यांनी स्पष्ट केली भूमिका

बनावट बक्षीसपत्र व साठेखत

तक्रारीनुसार, सुरेश चितांबर यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत आरोपींनी संगनमत करून त्यांना राहत्या घरातून उचलून नेले. त्यानंतर त्यांची मिळकत बळकावण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात तोतया व्यक्ती उभा करून बनावट बक्षीसपत्र व साठेखत तयार केले. यावर बनावट स्वाक्षऱ्या करून खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered)

आरोपींनी चितांबर यांच्या घरातून मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीची व पितळेची भांडी, बँक खात्यातील २६ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, एटीएम कार्ड, लॉकरच्या चाव्या आणि शेव्हरलेट कंपनीची चारचाकी गाडी चोरून नेली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.