Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी डीजेवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो. डीजेतील प्लाझमा (Plasma) सारखे प्रकार खूप त्रासदायक आहेत. प्लाझमांवर कारवाई व्हायला हवी, त्रासदायक नसलेले डीजे वापरण्यात यावेत तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात यावी, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा : मांजरी येथील ग्रामसभा ठरली वादळी; ग्रामविकास अधिकारी भोवळ येऊन बेशुद्ध
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महापुरुषांच्या जयंती, श्रीराम नवमी, गणेशोत्सव आदी सणांच्या मिरवणुकांत प्लाझमा वापरावा अथवा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात यावी. डीजेचा त्रास कोणालाही होऊ नये, अशी आमची भावना आहे. मिरवणुकीच्या आनंदातून दुसऱ्याला त्रास होणार नाही, असे वागणे गरजेचे आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अवजड वाहनांची गैरसोय
अहिल्यानगर शहरातील मुख्य स्मशानभूमी असलेल्या नालेगाव येथील अमरधाम जवळील कल्याण-विशाखापट्टण हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांची गैरसोय होताना पहायला मिळत आहे. या परिसरातील खासगी वास्तूविशारद पवन शिंदे यांनी मला एक कल्पना सांगितली की, या रस्त्यावर तात्पूर्त्या स्वरुपाचे बॅरिगेटिंग करायला हवे. त्यातून आपण कायम स्वरुपातील रस्ता दुभाजक व चौक सुशोभीकरण शक्य आहे. यातून वाहतूक नियंत्रण व अपघात नियंत्रण शक्य होईल. परिसरातील छोटे व्यावसायिक नेहमीच फोन करून प्रवाशांचा अपघात झाल्याचे सांगतात. हे अपघात टाळता येतील. पवन शिंदे यांनी दिलेल्या कल्पनेनुसार तत्पूर्ते बॅरिगेटिंग करण्यात आले आहे. खासगी तत्वावर कायम स्वरुपाचे दुभाजक व बॅरिगेटिंग करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले.
देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी चालतो (Sangram Jagtap)
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, जो आता प्रशासनाकडून फोटो हटवल्यानंतर शांत झाला आहे.या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता आमदार जगताप यांनी सांगितले की, महाराष्ट्र व देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी चालतो. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांनी प्रयत्न केला की, भारतात स्वराज्य निर्माण झाले पाहिजे. काही जण वेगळी विचारधारा भारतात पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नवीन पिढी समोर जातीवाद आणत आहेत. तेच आपण मालेगावमध्ये पाहत आहोत. महाराष्ट्रातील वातावरण खराब करायचे, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मालेगावमधील काही लोक करत आहेत. शासनाने अशा प्रवृत्तींना पायबंध घालावेत, अशी मागणी ही आमदार जगताप यांनी यावेळी केली.



