Gram Sabha : मांजरी येथील ग्रामसभा ठरली वादळी; ग्रामविकास अधिकारी भोवळ येऊन बेशुद्ध 

नाहरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज

0
Gram Sabha : मांजरी येथील ग्रामसभा ठरली वादळी; ग्रामविकास अधिकारी भोवळ येऊन बेशुद्ध
Gram Sabha : मांजरी येथील ग्रामसभा ठरली वादळी; ग्रामविकास अधिकारी भोवळ येऊन बेशुद्ध

Gram Sabha : राहुरी : राहुरी तालुक्यातील मांजरी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत (Gram Sabha) ग्रामविकास अधिकारी सुरेश डोंगरे (Suresh Dongre) यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आली. यामुळे ग्रामविकास अधिकारी भोवळ येऊन बेशुद्ध (Unconscious) झाल्याने ही सभा वादळी ठरली. याबाबत दोन जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरपासून; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती

नाहरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांजरी येथे ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामसभा बोलाविण्यात आलेली असताना ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा सुरू होती. त्यानंतर येथील सुनीता संदीप विटनोर यांनी मद्यपरवाना नाहरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज दिला होता. मात्र या अगोदर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत याबाबत मांजरी गावात तसेच शिवारात कुणालाही मद्यार्क परवाना नाहरकत देऊ नये असा ठराव झालेला असताना हा अर्ज ग्रामसभेपुढे आल्याने या विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सुरेश डोंगरे यांनी हा अर्ज ग्रामसभेत ठेवून त्यावर ज्या ग्रामस्थांना परवाना द्यायची भूमिका आहे अशा ग्रामस्थांनी हात वर करण्यासाठी सांगितले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

फिर्यादीत म्हटले की (Gram Sabha)

मात्र यावर कुठल्याही गग्रामस्थांमधून होकार न आल्याने सदरचा अर्ज मंजूर करता आला नाही याचा राग आल्याने संदीप एकनाथ विटनोर व त्यांचे वडिल एकनाथ विटनोर यांनी मला ग्रामसभेच्या कामकाज सुरू असताना दमदाटी करून शिवीगाळ केल्याचे डोंगरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत ही घटना झाल्यानंतर डोंगरे यांनी चक्कर आल्याने ते ग्रामसभेतच पडल्याने येथील ग्रामस्थानी तातडीने त्यांना येथील आरोग्य केंद्रात दाखल केले दरम्यान ग्रामसभा गुंडाळण्यात आली. या विषयामुळे इतर सर्वच विषय अनुत्तरित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पहावयास मिळाली.डोंगरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.