Attack on Vidyanand Bapat : नगर : पुणे महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत डीजेविरोधात आवाज उठवल्याने चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने त्यांना मारहाण केली असल्याचं सांगितलं जात असून एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना बापट यांच्यावर हा हल्ला झाला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
डीजेवरून आक्रमक भूमिका
विद्यानंद बापट हे मागील काही दिवसांपासून पुण्यात गणेशोत्सव काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. सर्वसामान्य पुणेकरांकडून बापट यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला जात असताना काही गणेश मंडळांकडून मात्र विरोध केला जात आहे. अशातच आज विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना एक तरुण तिथे आला आणि त्यांना मारहाण केली. तिथं उपस्थित असलेल्या इतर लोकांनी हल्लेखोर तरुणाला वेळीच थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.
नक्की वाचा : मांजरी येथील ग्रामसभा ठरली वादळी; ग्रामविकास अधिकारी भोवळ येऊन बेशुद्ध
हल्लेखोर ताब्यात (Attack on Vidyanand Bapat)
विशेष म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या टिळक रडत्यावर डीजेचा दणदणाट असतो त्याच टिळक रस्त्यावर त्यांना मारहाण झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत डीजेविरोधात आवाज उठवल्याने विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षणात बाहेर काढण्यात आले होते. या हल्ल्याच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु आहे. मात्र, पोलीस आता या व्यक्तीवर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



