
Ganeshotsav 2026 : कोपरगाव : गणेशोत्सव (Ganeshotsav 2026) शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस व प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargaon City Police Station) शहरातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
प्रशासनासमोर मांडल्या प्रशासनासमोर मांडल्या
यावेळी गणेशोत्सवातील सुरक्षा व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था, मंडपासाठी आवश्यक परवानग्या, सीसीटीव्ही व्यवस्था, गर्दी व वाहतूक नियंत्रण तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवाच्या आयोजनादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बैठकीस उपस्थिती (Ganeshotsav 2026)
बैठकीस शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले, उपपोलीस निरीक्षक दीपक रोटे, नगराध्यक्ष पराग संधान, महावितरणचे अधिकारी तसेच विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उत्सव काळात पोलीस प्रशासन, नगरपरिषद, महावितरण आणि गणेश मंडळांनी समन्वयाने काम करावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


