
Major action by Highway Police : कोपरगाव : समृद्धी महामार्गावर एका २४ वर्षीय तरुणाला उत्तर प्रदेशच्या दिशेने घेऊन जात असल्याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई (Major action by Highway Police) करत संशयित कार अडवली. या कारमधील तरुणासह सहा जणांना ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargaon City Police Station) हजर करण्यात आले.
तरुणाला काही उत्तर प्रदेशच्या दिशेने घेऊन जात हाेते
बुधवार दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी समृद्धी महामार्गावर बाभळेश्वर महामार्ग पोलिसांचे पथक कर्तव्यावर असताना कंट्रोलकडून माहिती मिळाली की, कार क्रमांक UP 90 AE 9375 मधून आरशद शकील अहमद सिद्दीकी (वय २४, रा. चिखली, पुणे) या तरुणाला काही व्यक्ती उत्तर प्रदेशच्या दिशेने घेऊन जात आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाठलाग करून कार थांबवली (Major action by Highway Police)
माहिती मिळताच पोलिसांनी समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरमध्ये शोध सुरू केला. यावेळी चॅनल क्रमांक ५२३ जवळ संशयित कार भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी पाठलाग करून चॅनल क्रमांक ५२० येथे कार थांबवली.
कारमधील व्यक्ती आणि तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये महमद अन्वर सिद्दीकी (३९), निजामुद्दीन सिद्दीकी (४१), फाजील हुसेन सिद्दीकी (२३), महंमद साहील सिद्दीकी (२१), महंमद सिद्दीकी इमामुद्दीन सिद्दीकी आणि सायमा खातून सिद्दीकी (२६) अशी नावे समोर आली. त्यानंतर सर्वांना कारसह कोकमठाण टोल नाक्यावर आणण्यात आले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथील चिखली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळविण्यात आल्यानंतर तरुणासह संशयित व्यक्तींना कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, संबंधित तरुणाला नेमक्या कोणत्या परिस्थितीत घेऊन जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत.


