Wild Vegetable Festival : रानभाजी उत्सवाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Wild Vegetable Festival : रानभाजी उत्सवाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Wild Vegetable Festival : रानभाजी उत्सवाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Wild Vegetable Festival : रानभाजी उत्सवाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Wild Vegetable Festival : अकोले : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Integrated Tribal Development Project) राजूर व सोबती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज अकोलेतील बाजारातळावर रानभाजी उत्सवाचे (Wild Vegetable Festival) यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने जपल्या जाणाऱ्या विविध रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला बचतगट (Women’s Self-Help Groups) व उद्योजिकांना प्रोत्साहन देणे, हा या उत्सवाचा उद्देश होता.

सेंद्रिय पद्धतीच्या विविध रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध

आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवात ग्रामीण भागातील महिलांनी रासायनिक खतांपासून दूर राहून सेंद्रिय पद्धतीने जपलेल्या विविध रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. तसेच महिलांनी रानभाज्यांपासून तयार केलेले विविध पारंपरिक व पौष्टिक पदार्थ प्रदर्शनात मांडले. उत्कृष्ट पाककृतींची निवड करून संबंधित महिलांना बक्षिसे देत गौरविण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (Wild Vegetable Festival)

यावेळी अत्यंत खडतर परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय उभा करून तब्बल १ हजार किलो लोणच्यांची विक्रमी विक्री करणाऱ्या शोभना सोनवणे यांनी उपस्थित महिलांना व्यवसायविषयक मार्गदर्शन केले. तसेच मोबाईलचा योग्य व प्रभावी वापर करून व्यवसायाचा विस्तार कसा करता येतो, याबाबत सीता पिचड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उपस्थित नागरिकांनी लाभ घेतला. रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला अकोले तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.