Verbal abuse of a police officer : मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत शिवीगाळ; चार जणांविरुद्ध गुन्हादाखल

Verbal abuse of a police officer : मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत शिवीगाळ; चार जणांविरुद्ध गुन्हादाखल

0
Verbal abuse of a police officer : मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत शिवीगाळ; चार जणांविरुद्ध गुन्हादाखल
Verbal abuse of a police officer : मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत शिवीगाळ; चार जणांविरुद्ध गुन्हादाखल

Verbal abuse of a police officer : नगर : मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ती पुढे नेण्याच्या सूचना देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत शिवीगाळ (Verbal abuse of a police officer) व धक्काबुक्की केल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरातील नेताजी सुभाष चौक परिसरात घडला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) संशयित आरोपी सुनिल शंकर करांदे (रा. लक्ष्मी कारंजा, अहिल्यानगर) याच्यासह तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (Case registered) करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिरवणूक पुढे नेण्याच्या सूचना

पोलीस अंमलदार अनुप शेखर झाडबुके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (ता.६) रात्री साडेनऊच्या सुमारास माळीवाडा ते गोगादेव मंदिरमार्गे सर्जेपुरा या मार्गावर निशाण मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीतील सात मंडळे नेताजी सुभाष चौक परिसरात आली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच मिरवणुकीसाठी देण्यात आलेली परवानगीची वेळ संपत आल्याने पोलिसांकडून मिरवणूक पुढे नेण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मिरवणूक पुढे नेण्यास विरोध (Verbal abuse of a police officer)

फिर्यादी अनुप झाडबुके व पोलीस कर्मचारी पांढरकर हे साध्या वेशात बंदोबस्तावर होते. त्यांनी हिंदवी शौर्य वाद्य पथकातील सदस्यांना आपण कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती पोलिसांना ओळखत असतानाही त्याने मिरवणूक पुढे नेण्यास विरोध केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


यानंतर झाडबुके यांनी त्याला विनाकारण अडथळा निर्माण न करता मिरवणूक पुढे नेण्यास सांगितले. त्यावेळी संशयित आरोपी सुनिल शंकर करांदे (रा. लक्ष्मी कारंजा, अहिल्यानगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी कथितरीत्या अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून येत धक्काबुक्की केली. ‘तू कुठला पोलीस, तुझ्याकडे पाहतोच,’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मसपोनि पूनम श्रीवास्तव करीत आहेत.