Dimbhe- Manikdoh : पुण्यातून विरोध तर नगर जिल्ह्यात श्रेयवाद; डिंभे – माणिकडोह मंजुरीनंतर नेत्यांचे सत्कार सोहळे

डिंभे- माणिकडोह मंजुरीनंतर रंगली श्रेयवादाची लढाई

0
Dimbhe- Manikdoh : पुण्यातून विरोध तर नगर जिल्ह्यात श्रेयवाद; डिंभे - माणिकडोह मंजुरीनंतर नेत्यांचे सत्कार सोहळे
Dimbhe- Manikdoh : पुण्यातून विरोध तर नगर जिल्ह्यात श्रेयवाद; डिंभे - माणिकडोह मंजुरीनंतर नेत्यांचे सत्कार सोहळे

Dimbhe- Manikdoh : कर्जत : कुकडी प्रकल्पासाठी (Kukadi Project) ५ हजार ७०४ कोटी रुपयांची चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता (Administrative Approval) मिळाली आहे. यामध्ये अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या डिंभे – माणिकडोह (Dimbhe- Manikdoh) बोगद्याचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, याला पुणे जिल्ह्यातील काही नेत्यांनी कडाकडून विरोध केला आहे. अशी परिस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेत्यांनी एकजुटीने हा विरोध मोडून काढून प्रकल्प लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. मात्र, नगर जिल्ह्यात निधी उपलब्धतेवरून सर्वच राजकीय पक्षाच्या व लोकप्रतिनिधींमध्ये आपली पाठ थोपटून घेत तो मीच अशी सोशल मीडियावर राळ उडवत सत्कार घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णयाची मागणी; अखंड मराठा समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्थानिक निवडणुकीत कुकडी कळीचा मुद्दा

कर्जत-जामखेडमध्ये कुकडीचा पाणी प्रश्न सर्वच निवडणुकीत महत्वाचा मुद्दा राहिला. यावरून आमदार, खासदार यासह स्थानिक लोकप्रतिनिधी देखील ठरला जायचा. जो पाण्याचा शब्द देईल तो नेता ठरत. त्यामुळे कुकडी स्थानिक निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरत असे. कुकडी अवर्तनात पुणे जिल्हा वरचढ ठरत असताना नगर-सोलापुर जिल्ह्यास दुय्यम स्थान दिले जायचे. पाणी वाटपात देखील टेलच्या लाभक्षेत्रातील गावांना दुजाभाव दिला जायचा. वेळोवेळी तत्कालीन लोकप्रतिनिधी आपल्या परीने यास तोंड देत पाणी उपलब्ध करीत. नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगद्यास हिरवा कंदील देत यासाठी चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली.

यासाठी तब्बल ५ हजार ७०४ कोटी आणि ५० लक्ष रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली. याची घोषणा होताच कुकडी लाभक्षेत्रातील सर्वच लोकप्रतिनिधी खडबडून जागे होत आपलाच पाठपुरावा कामी आला या आशयाचे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करीत कार्यकर्त्यांच्या हातून सत्कार सोहळे आयोजित केले. जुने पत्र, मंत्रिमंडळातील नेत्यांना भेटलेले फोटो टॅग करीत श्रेय घेण्याची रांग लावली. त्यामुळे नेमके कोणाचे राजकीय वजन शासन दरबारी पडले हा प्रश्न उभा राहिला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

डिंभे- माणिकडोह मंजुरीनंतर रंगली श्रेयवादाची लढाई (Dimbhe- Manikdoh)

जलसंपदा तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रश्न तडीस लावला की, आमदार रोहित पवार यांचे व्हिजन कामी आले. यासह श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी हातभार लावला की सभापती राम शिंदे मदतीला धावले हे उमगले नाही. मात्र कर्जतला या सर्व घाई-गडबडीत राम शिंदेनी आपला सत्कार उरकून घेतला. तर दुसरीकडे पाचपुतेंनी देखील आपला सत्कार कार्यकर्त्यांकडून केला. आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या सोशल मीडियावर पाठपुरावा केल्याचे फोटो आणि पत्र व्हायरल केले.

स्थानिक तालुक्यात चर्चा

त्यामुळे निधी सरकारचा असला तरी स्थानिक आमदारांनी आपला सत्कार आणि सन्मान सोहळा पार पाडून घेत श्रेयवादात मागे नाही हे दाखवून दिले. आगामी काळात या डिंभे-माणिकडोह बोगद्याचा पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळयास मोठा फायदा होणार आहे. पुणे,नगर आणि सोलापूर जिल्ह्यास वरदान ठरणारा कुकडी प्रकल्पास शासनाने उपलब्ध केलेला निधी महायुती सरकारचे आभार न मानता स्थानिक नेत्यांनी आपलाच सत्कार सोहळा करण्यात धन्यता मानली असल्याची चर्चा स्थानिक तालुक्यात चर्चिली जात आहे.

कर्जत तालुक्यातील ५४ गावे कुकडी लाभक्षेत्रात

कर्जत तालुक्यातील ११८ गावांपैकी तब्बल ५४ गावे ही कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट आहे. या कुकडी प्रकल्पामुळे कर्जत तालुक्यास खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे एकूण ४ आवर्तने मिळतात. तालुक्यातील एकूण २८ हजार २८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. यामुळे तालुक्यातील हा भाग सुजलाम-सुफलाम होण्यास मदत मिळते.  त्यामुळे या लाभक्षेत्रातील मतदार या कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतात.

या गावांचा समावेश

कर्जत तालुक्यात १६५ किमी ते २११ एकूण ४६ किमीचा कुकडी कालवा. यात येसवडी आणि चिलवडी या दोन शाखा कालव्याचा समावेश होतो. सदरचा कालवा कर्जतमधून प्रकल्पाचा अंतिम टोक असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळयास जातो. कुकडी प्रकल्पात कर्जत तालुक्यातील कर्जत, कोरेगाव, आंबीजळगाव, लोणी मसदपूर, राशीन, करपडी, बजरंगवाडी, जळकेवाडी, दिघी, चापडगाव, तोरकडवाडी, येसवडी, परीटवाडी, खातगाव, थेरवडी, अलसुंदे, निंबे, पाटेवाडी, नांदगाव, कोपर्डी, शिंदे, तळवडी, गलांडवाडी, काळेवाडी, पिंपळवाडी, भांडेवडी, धालवडी, वायसेवाडी, निमगाव डाकू, कोळवडी, चिलवडी, सोनाळवाडी, कुंभेफळ, नेटकेवाडी, धांडेवाडी, देशमुखवाडी, कानगुडवाडी, बेनवडी, देवकरवाडी, धनगरवाडी, बारडगाव सुद्रीक, बारडगाव दगडी, करमणवाडी, वडगाव तनपुरे, जामदारवाडा, रुईगव्हाण, दूरगाव, अखोनी, कुळधरण, राक्षसवाडी खुर्द, राक्षसवाडी बुद्रुक, म्हाळगी, डोंबालवाडी आणि रौकाळेवाडी या एकूण ५४ गावांचा समावेश होतो.