Local Crime Branch : राहुरीतील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ८ जण ताब्यात

Local Crime Branch : राहुरीतील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ८ जण ताब्यात

0
Local Crime Branch : राहुरीतील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ८ जण ताब्यात
Local Crime Branch : राहुरीतील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ८ जण ताब्यात

Local Crime Branch : नगर : राहुरी (Rahuri) तालुक्यातील गंगापूर शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने सोमवारी (ता.७) छापा टाकला. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह पाच मोबाईल आणि पाच दुचाकी असा एकूण ३ लाख ४४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांना घेतले ताब्यात

या कारवाईत ज्ञानेश्वर पुंजा पवार (३४, रा. कोल्हार खुर्द), अनिल दत्तात्रय होडगर (२९, रा. पिंपळगाव फुणगी), चिमा खंडू वडीतके (४५, रा. गंगापूर), बाळासाहेब विठ्ठल तुपे (६०, रा. गळनिंब), मनोहर रामदास नान्नोर (३८, रा. गंगापूर), किरण साहेबराव होण (३६, रा. कडित), विठ्ठल बाळासाहेब चितळकर (३८, रा. मांडवे) आणि रामदास रावजी नान्नोर (६८, रा. गंगापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती (Local Crime Branch)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर गावाच्या शिवारातील एस.के. पेपर मिल कंपनीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही जण गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले.


पथकाने आरोपींची अंगझडती घेतली असता ४ हजार ७१० रुपये रोख, ९० हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास व कारवाई राहुरी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश धोत्रे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आतार व विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली आहे.