Kopargaon Cha Raja : ‘कोपरगावच्या राजा’चा भव्य आगमन सोहळा उत्साहात साजरा

Kopargaon Cha Raja : ‘कोपरगावच्या राजा’चा भव्य आगमन सोहळा उत्साहात साजरा

0
Kopargaon Cha Raja : ‘कोपरगावच्या राजा’चा भव्य आगमन सोहळा उत्साहात साजरा
Kopargaon Cha Raja : ‘कोपरगावच्या राजा’चा भव्य आगमन सोहळा उत्साहात साजरा

Kopargaon Cha Raja : कोपरगाव : ढोल-ताशांचा निनाद, भक्तिगीतांवर थिरकणारे भाविक, आकर्षक रोषणाईने उजळलेला परिसर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंतात निर्माण झालेला उत्साह… अशा भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) प्रतिकृती असलेल्या ‘कोपरगावच्या राजा’चा (Kopargaon Cha Raja) भव्य आगमन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Kopargaon Cha Raja : ‘कोपरगावच्या राजा’चा भव्य आगमन सोहळा उत्साहात साजरा
Kopargaon Cha Raja : ‘कोपरगावच्या राजा’चा भव्य आगमन सोहळा उत्साहात साजरा

सोहळ्याने संपूर्ण कोपरगाव शहर भक्तीमय

संघर्ष फाउंडेशन ट्रस्ट व सार्वजनिक गणेशोत्सव समिती, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण कोपरगाव शहराला भक्तीच्या रंगात रंगवून टाकले. सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकपासून गणेशमूर्तीच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. येवला रोडपर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी (Kopargaon Cha Raja)

लालबागच्या राजाची सुप्रसिद्ध गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकार संतोषदादा रत्नाकर कांबळी यांच्या कलाकुसरीतून साकारलेली ‘कोपरगावच्या राजा’ची भव्य मूर्ती मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरली. बाप्पाच्या प्रसन्न आणि लोभस रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नजर गणरायावर खिळली होती.

मिरवणुकीपूर्वी परमपूज्य महंत रमेशगिरी महाराज, परमानंद महाराज यांच्या हस्ते गणेशमूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मिरवणुकीला प्रारंभ झाला.

मिरवणुकीत ‘चेंबूर बीट्स’ पथकाच्या दमदार वादनाने वातावरणात उत्साहाची लहर निर्माण केली. भक्तिगीतांवर भाविकांनी ठेका धरला, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. आकर्षक रोषणाईने सजलेला मिरवणुकीचा मार्ग आणि बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.

यावेळी हनुमंतराव हिंदू व्यायाम मंदिराच्या दहीहंडी पथकाच्या वतीने सलामी देण्यात आली. या आकर्षक सलामीने उपस्थित गणेशभक्तांची मने जिंकली.

मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी आणि आरती करत ‘कोपरगावच्या राजा’चे स्वागत केले. बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी तसेच तो भक्तिमय क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तरुणांसह आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली होती.

या सोहळ्यास महंत रमेशगिरी महाराज, आत्मा मालिकचे परमानंद महाराज, विविध मान्यवर, गणेशभक्त, संघर्ष फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कोपरगावकर उपस्थित होते.

ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीतांचा स्वर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘कोपरगावच्या राजा’चे झालेले हे दिमाखदार आगमन कोपरगावकरांसाठी भक्ती आणि उत्साहाचा अविस्मरणीय क्षण ठरले.