Raid on a Gambling Den : नगर : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील अहिल्यादेवीनगर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर (Raid on a Gambling Den) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकला. या कारवाईत १९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणारा एक जण फरार आहे. पोलिसांनी (Police) एकूण ४ लाख ७५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१९ जणांना घेतले ताब्यात
या कारवाईत लक्ष्मण कान्हु दासरयोगी, राजेंद्र गंगाधर मापारी, ईर्शाद अलि शेख, सतीष आप्पासाहेब शेळके, हसन युनूस शहा, रवी विठ्ठल हतांगळे, सद्दाम शफी शेख, दत्तात्रय भाऊसाहेब उंडे, बबलू शफी शेख, वसीम मुक्तार शेख, आकाश सुरेश लोखंडे, विकी दुर्गा दासरयोगी, संतोष रामभाऊ राशीनकर, प्रतीक बाबासाहेब हिवाळे, राजू शब्बीर शेख, गोकुळ आसाराम तागड, आप्पासाहेब लक्ष्मण विखे, मच्छिंद्र गोरख मापारी आणि विकास चंदन लोखंडे या १९ जणांना ताब्यात घेण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई(Raid on a Gambling Den)
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, 8 सप्टेंबर रोजी निपाणी वडगावच्या शिवारातील अहिल्यादेवीनगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण पैसे लावून ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री केल्यानंतर पंचांसमक्ष पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.



