Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदणी मठात आणण्याच्या प्रयत्नांना पेटाचा धक्का

0
Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदणी मठात आणण्याच्या प्रयत्नांना पेटाचा धक्का

नगर :  कोल्हापूरच्या (Kolhapur) नांदणी मठातील (Nandni Math) माधुरी हत्तीणीची (Madhuri Elephant) घरवापसी अंतिम टप्प्यात आहे. माधुरी हत्तीणीबाबतची उच्चस्तरीय समिती समोरील सुनावणी पूर्ण झाली आहे. अंतिम सुनावणीमध्ये नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या सुविधांची सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. मात्र या अंतिम सुनावणी नंतर उच्च स्तरीय समितीने आपला निकाल राखून ठेवला, परंतु आता पेटाने (Peta) त्यांना एक मोठा धक्का दिला आहे. माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच पेटाकडून राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे.

नक्की वाचा : २ कोटी कर्जावर तब्बल १८ कोटींचे व्याज;अहिल्यानगरच्या दोन सावकारांना अटक

‘माधुरी हत्तीणीला वन तारामध्येच ठेवा’ (Madhuri Elephant)

पेटाकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलेल्या पत्रात ‘माधुरी हत्तीणीला वन तारामध्येच ठेवा’ असं सांगण्यात आले आहे.  माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच पेटाकडून पुन्हा राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे, त्यामुळे आता यावर सरकार काय निर्णय घेणार? माधुरी नांदणी मठामध्ये पुन्हा परतणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

अवश्य वाचा : कचऱ्यापासून तयार होणार बायोगॅस; अहिल्यानगर महापालिकेचे वाचणार लाखो रुपये

माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये सोपवण्यास स्थानिकांचा विरोध (Madhuri Elephant)

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपविण्यात आलं होतं. नांदणी मठात माधुरी हत्तीणीसाठी आवश्यक असलेल्या सोई सुविधा नसल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं. माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध होता. मात्र तरी देखील या हत्तीणीला वनतारामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा या हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माधुरी हत्तीणीबाबतची उच्चस्तरीय समिती समोरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असतानाच आता पेटाने राज्य सरकारला पत्र पाठवून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे.