
Retro trends of the 1980s : कोपरगाव : सोशल मीडिया (Social Media) विश्वात सध्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या १९८०च्या दशकातील रेट्रो ट्रेंडची (Retro trends of the 1980s) जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वसामान्य सोशल मीडिया युजर्सपासून सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकजण एआयच्या (Artificial Intelligence) माध्यमातून आपले १९८०च्या दशकातील रूप साकारत हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या ट्रेंडला कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे आणि विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे हेही अपवाद ठरलेले नाहीत.
रेट्रो लूकमधील फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर
त्या काळातील लूक, स्टाईल आणि अंदाज अनुभवण्याचा मोह दोन्ही आमदारांनाही आवरला नाही. त्यांनी एआयच्या मदतीने १९८०च्या दशकातील रेट्रो लूकमधील फोटो तयार करून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे त्यांच्या चाहत्यांसह सोशल मीडिया युजर्समध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एआय फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Retro trends of the 1980s)
एआय तंत्रज्ञानामुळे आज केवळ कल्पनांना आकार देणेच नव्हे, तर आपण एखाद्या जुन्या काळात कसे दिसलो असतो, याची कल्पनाही प्रत्यक्ष छायाचित्राच्या रूपात अनुभवता येत आहे. त्यामुळे १९८०च्या दशकातील कपडे, हेअरस्टाईल, पार्श्वभूमी आणि त्या काळातील एकूणच वातावरण दाखवणारे एआय फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
कोपरगावातील या दोन्ही राजकीय नेत्यांनीही या ट्रेंडमध्ये सहभागी होत आपला रेट्रो अंदाज सोशल मीडिया युजर्ससमोर आणला आहे. त्यामुळे राजकारणासोबतच एआयच्या नव्या प्रयोगाचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
एकूणच, सध्या ट्रेंडिंग असलेल्या ‘१९८०s ट्रेंड’ने एआयच्या माध्यमातून जुन्या दशकाची सफर पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर आणली असून, आठवणींनाही आधुनिक तंत्रज्ञानाची नवी किनार मिळाली आहे.


