
नगर : दुष्काळाने सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ज्या ज्या भागात उभी पिके करपून गेली आहेत. त्याचे सर्व्हेक्षण केलं जाणार आहे. थेट अधिकारी शेतात येऊन हे सर्व्हेक्षण (Survey) करणार आहेत. काल (ता.९) झालेल्या कॅबिनेटच्या (State Government Dicision) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना त्याबाबतचे आदेशच दिल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
नक्की वाचा : २ कोटी कर्जावर तब्बल १८ कोटींचे व्याज;अहिल्यानगरच्या दोन सावकारांना अटक
बळीराजाला नियमाप्रमाणे मिळणार नुकसान भरपाई (State Government Dicision)

राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही महत्त्वाची माहिती दिली. ज्या ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पिके करपली आहेत, त्याचं सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच बळीराजाला नियमाप्रमाणे आवश्यक ती नुकसान भरपाई देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग तिघेही मिळून हे सर्व्हेक्षण करणार आहेत. हे संपूर्ण सर्व्हेक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना निश्चित मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
अवश्य वाचा : माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदणी मठात आणण्याच्या प्रयत्नांना पेटाचा धक्का
मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटप सुरू (State Government Dicision)
मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटप सुरू झालं आहे, त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रमाणपत्र देण्यासाठी यापूर्वी देखील कॅम्प लागले होते. सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला होता. सरकारने यापूर्वी जात प्रमाणात वितरित केले आहेत. जी नियमावली आहे, त्यानुसार कॅम्प लावणे हे शासनाचे धोरणच आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.


