Accident : भाळवणीत भरधाव आयशरची कारला धडक; चार जणांचा मृत्यू

पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

0
Accident : भाळवणीत भरधाव आयशरची कारला धडक; चार जणांचा मृत्यू
Accident : भाळवणीत भरधाव आयशरची कारला धडक; चार जणांचा मृत्यू

Accident : पारनेर : नगर-कल्याण महामार्गावर (Nagar-Kalyan Highway) भाळवणी गावच्या शिवारात हॉटेल संदीपसमोर गुरुवारी (ता. १०) पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात (Accident) कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू (Death) झाला. मृतांमध्ये शकील मोहम्मद शेख (वय ४५), सलमा शकील शेख (वय ४२), ईकबाल शकील शेख (वय २३) आणि सुमैय्या शकील शेख (वय १८, सर्व रा. नुराणी मशीदसमोर, मालवणी, मुंबई) यांचा समावेश आहे.

नक्की वाचा : अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनाच्यायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; प्यारे खान यांचे निर्देश

पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

याबाबत अल्ताफ शब्बीर शेख (वय ५२, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शकील शेख हे कुटुंबासह अहिल्यानगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी कारमधून येत होते. पहाटे दोनच्या सुमारास भाळवणी शिवारातील हॉटेल संदीपसमोर त्यांच्या कारला आयशर टेम्पोने समोरून जोराची धडक दिली. धडकेनंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधील शकील शेख, सलमा शेख, ईकबाल शेख आणि सुमैय्या शेख हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आयशर चालक घटनास्थळावरून पसार (Accident)

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानंतर जखमींना पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चौघांनाही सकाळी १० वाजून ५६ मिनिटांनी मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चालकाविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास करण्यात येत आहे.