
Jewelry Stolen : नगर : घरात मुक्कामी आलेल्या पुतणीने कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परस्पर घेऊन गेल्याची (Jewelry Stolen) तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दाखल करण्यात आली आहे. भुषणनगर, केडगाव येथील ईश्वर बाबासाहेब गोरे (वय ३८) यांनी याबाबत फिर्याद (Complaint) दिली आहे.
घरातील कोणालाही काही न सांगता निघून गेली
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांची पुतणी विशाखा जाधव (रा. मालेगाव, नाशिक) हिची अहिल्यानगर येथील एका खासगी बँकेच्या शाखेत बदली झाली होती. भाड्याने घर मिळेपर्यंत काही दिवस राहण्यासाठी ती ६ सप्टेंबर रोजी सकाळी गोरे यांच्या घरी आली होती. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विशाखा घरातील कोणालाही काही न सांगता निघून गेली. ती मालेगाव येथील घरीही पोहोचली नसल्याचे समजल्यानंतर गोरे यांनी ८ सप्टेंबर रोजी तिची मिसिंग तक्रार दाखल केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दागिने नेल्याचा संशय व्यक्त (Jewelry Stolen)
यानंतर गोरे यांच्या पत्नी जयश्री यांनी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली असता सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि चार ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले आढळून आली नाहीत. घरात इतरत्र शोध घेऊनही दागिने मिळाले नसल्याने विशाखानेच दागिने नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गोरे यांनी जाधव हिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


