Lok Adalat : लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणात ४४ लाखांची नुकसानभरपाई; तडजोडीने प्रकरण निकाली

तडजोडीने प्रकरण निकाली मयत मानसी शर्मा यांच्या वारसांना धनादेश प्रदान

0
Lok Adalat : लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणात ४४ लाखांची नुकसानभरपाई; तडजोडीने प्रकरण निकाली
Lok Adalat : लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणात ४४ लाखांची नुकसानभरपाई; तडजोडीने प्रकरण निकाली

Lok Adalat : नगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Services Authority), अहमदनगर व जिल्हा न्यायालय (District Court), अहमदनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात (National Lok Adalat) मोटार अपघात नुकसानभरपाईच्या एका प्रकरणात मयत मानसी हेमंत शर्मा यांच्या वारसांना तब्बल ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. अर्जदारांच्या वतीने ॲड. राहुल झावरे व ॲड. स्नेहा राहुल झावरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. विमा कंपनी व अर्जदार यांच्यात आपसात तडजोड होऊन ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली. त्याबाबतचे तडजोडपत्र राष्ट्रीय लोकन्यायालयात नोंदविण्यात आले.

नक्की वाचा : मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा मार्ग ठरला; १६ सप्टेंबरला श्रीगोंद्यात मुक्काम

धनादेश संबधित वारसांना  प्रदान

लोकन्यायालयाच्या आदेशानुसार आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मयत मानसी शर्मा यांच्या वारस मायादेवी शर्मा यांना नुकसानभरपाईच्या रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब शिवाजी कचरे, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश-१व अतिरिक्त सत्र न्यायाधीश साहेब श्री. आर. एस. गुप्ता, यांच्या हस्ते संबधित वारसांना प्रदान करण्यात आला. यावेळी के. एस. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-६, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, वाय. एस. पैठणकर, पॅनल विधीज्ञ ॲड. फारुक शेख, अर्जदारांचे वकील ॲड. राहुल झावरे व ॲड. स्नेहा राहुल झावरे, विमा कंपनीच्या वतीने ॲड. सुजाता गुंदेचा, ॲड. शहादेव जगताप, सुधा भगत तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आर. एस. गुप्ता, यांनी सांगितले की (Lok Adalat)

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश-१व अतिरिक्त सत्र न्यायाधीश साहेब आर. एस. गुप्ता, यांनी सांगितले की, आपसातील तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढल्यास अर्जदार तसेच विमा कंपनी या दोन्ही पक्षांना त्याचा लाभ होतो. वाद तडजोडीने मिटल्यामुळे न्यायव्यवस्थेवरील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे न्यायालयाला इतर प्रकरणांमध्ये अधिक प्रभावीपणे न्याय देता येतो. तसेच मोटार अपघात प्रकरणातील अर्जदारांना नुकसानभरपाईची रक्कम लवकर मिळाल्याने त्यांच्या पुढील आयुष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे सर्व पक्षकार व विमा कंपन्यांनी परस्पर सामंजस्यातून वाद निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.