Maratha Reservation : मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा मार्ग ठरला; १६ सप्टेंबरला श्रीगोंद्यात मुक्काम

0
Maratha Reservation : मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा मार्ग ठरला; १६ सप्टेंबरला श्रीगोंद्यात मुक्काम
Maratha Reservation : मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा मार्ग ठरला; १६ सप्टेंबरला श्रीगोंद्यात मुक्काम

Maratha Reservation : नगर : मुंबई येथे आंदोलन करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तारीख जाहीर केली आहे. १५ सप्टेंबरला अंतरवली सराटीतून (Antarwali Sarati) ११ वाजता मोर्चाला सुरुवात करणार आहे. उपोषण न सोडता उपोषण करतच मुंबई येथील आझाद मैदानावर (Azad Maidan) १९ सप्टेंबरला उपोषणाला बसणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथील उपोषणाच्या पंधराव्या दिवशी मराठा समाजबांधवना संबोधित करताना म्हणाले.

नक्की वाचा : मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीच्या बाणेर स्थित‘मर्लिन व्हेंटाना’ला प्रोजेक्ट ऑफ द इअर पुरस्कार

मनोज जरांगेंचा इशारा

मुंबईला जायच्या तयारीला लागा हे सांगताना मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. मराठा आरक्षणाच्या मागणीची ही शेवटची लढाई आहे या लढाईत जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाने मुंबईला यावे, ज्यांना जमणार नाही त्यांनी आम्ही निघालेल्या मार्गावर दीडशे किलोमीटर पर्यंत आमच्या सोबत राहावे. सलाईन वर जिवंत आहे, वाटे लावयाला या, मुंबईततुन जिवंत येईल की नाही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील आंदोलन शांततेत होईल असा शब्द त्यांनी दिला मात्र आमच्या एखाद्या मुलाचे रक्त सांडल्यास दहा मिनिटात संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल असा इशाराही जरांगे यांनी दिला.

कुणाला खुन्नस देण्यासाठी आपल्याला मुंबईत जायचं नाही. आपल्याला कुणी खुन्नस दिली तर त्याला खुन्नस देऊ नका, न्यायदेवता गोर-गरिबांच्या बाजूने आहे त्यामुळे न्यायदेवतेचा आपल्याला सन्मान करायचा आहे. त्यामुळे अंतरवालीत निघाल्यापासून मुंबईत शेवटपर्यत सगळ्यांना शांततेत आंदोलन करायचं आहे दगडफेक,धिंगाणा ,जाळपोळ करायचा नाही.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जरांगे पाटील म्हणाले की (Maratha Reservation)

यावेळी पोलिसांना आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले,पोलिसांनी, गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवाली सराटी ते मूंबई प्रवासादरम्यान कोणतेही बॅरेकेट लावायाचे नाही, अडविले तर बॅरेकटला कोणीही हात लावायचा नाही,तिथेच बसून राहयाचे, नाही पर्याय रस्त्यावरून प्रवास करण्याचे त्यांनी सांगितले.*देवेंद्र फडणवीस मराठ्यांना अडवू नका आमचा रोष अंगावर घेऊ नका,आम्हाला अडवल्यास मराठा मतदार तुमच्यापासून दूर जाईल असे ते म्हणाले. .+सरकारनं हैदराबाद गझिटीयर  नुसार शपथपत्र नुसार देणार नाही शिबिरात अधिकारी म्हणातात,मग तो जिआर कशाला काढला , शपथपत्र नुसार देत नाही,५८ लाख प्रमाणपत्र गावागावात चिटाकावले नाही, सातारा कोल्हापूर औंध, गॅझेटीयर जीआर काढला नाही,  हे सर्व मुंबई जाऊन मार्गी लावणार, असल्याचे सांगितले.

आम्ही मुंबईत येतोय: मनोज जरांगे

माय माऊली या मुंबईत यायचं, असेल ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी घराघरातुन एक महिला यायचं, मुंबईत अमृता फडणवीस वहीणींना, म्हणा फडणवीस साहेबांना आरक्षण देण्याचे आणि,लता वहीणी शिंदे यांना, हळदी कुंकू द्यायला जायचं, ते पण शांततेत, लावायचे कुंकू लावताना साहेबांना आरक्षण देणं सांगावे लता वहीणी सांगायाचे एकनाथ भाईला आरक्षण द्यायचे म्हणून, हिंदू संस्कृतीची जाण असेल तर दाराबाहेर येतील”जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने मराठा महिलांकडून हळदी-कुंकू स्वीकारले, तर त्यानंतर आरक्षण द्यावे लागेल’, असे ते म्हणाले. सातारा संस्थान गॅझेट सरकारने आश्वासन देऊनही वर्षभरापासून दिलं नाही. दुसरी संधी मे महिन्यात दिली. म्हणून आम्ही मुंबईत आंदोलनासाठी येत आहोत. तिसरी संधी या उपोषणादरम्यान 15 दिवसांची होती पण सरकारने गॅझेट लागू केले नाही त्यामुळे आम्ही मुंबईत येतोय असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जालना कलेक्टरचा राजकीय स्वार्थासाठी वापर

मराठयांचा प्रश्न मार्गी लावा मुंबईत येणार नाही, आजपासून मुंबई येऊस्तर आमच्या मार्ग काढा आम्ही मुंबईला येणार नाही, अंतरवाली सराटी या अंतरवाली सराटी नाही आले तर रस्त्यावर येवू शकता, . मुक्काम ठिकाणी नाही जमत  तर पाचशे फुटांवर या म्हणालो तरी येतोय,मिडीयासोबत तिथं चर्चा करु तिथे नाही झाले तर आझाद मैदानावर, चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. इथे लिंग भेद नाही, महिलांचा सन्मान करतो,” असे सांगत, जालना कलेक्टरचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत असताना अशा गोष्टी सहन करणार नसल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

कायदा सुव्यवस्था अबाधित राहील असं वागा

बावनकुळया कोणत्या जिल्ह्यात कामे झाली नाहीत.त्या जिल्ह्यात दारु कशी आहे हे आता आम्ही बघू,भुजबळ म्हणतो कलेक्टर नर्व्हस झाल्या हे भुजबळ यांना आणि बावणकुलेंना कसं माहीत.? बावणकुळ्या, तू कलेक्टरला आमच्या अंगावर घालू नको. मराठा समाजाला सर्व दिले हे,सांगणे कलेक्टरचे काम नाही ते मुख्यमंत्र्यांचे काम आहे.मराठ्यांना सगळं दिलं हे सांगण्याच काम तुमचं नाही.मराठा समाजात इज्जत राहील असं वागा कायदा सुव्यवस्था अबाधित राहील असं वागा,आमच्यावर ताशेरे ओढाल तर तुमचा पुढचा काळ अवघड जाईल

छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे कलेक्टरला आमच्या अंगावर घालत आहेत. महिलेची आम्ही इज्जत केली नाही असा आरोप केला जात आहे. बावनकुळे आणि भुजबळांना सांगतो. आम्ही लिंग भेद मानत नाही. इथे लिंग भेद नाही. पुरूष आणि स्त्री दोन्ही सारखेच आहेत. त्यामुळे हा भेद इथे आणू नका. नाही तर तुम्हाला भारी पडेल.

असा असेल म मुंबईचा दौरा…

अंतरवली सराटीतून सुरू होणारा हा मोर्चा अत्यंत शांततापूर्ण मार्गाने मुंबईच्या दिशेने पुढे सरकेल. चार ठिकाणी मुक्काम करत पाचव्या दिवशी हा मोर्चा मुंबईत दाखल होईल.असे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी सांगितले.

१५ सप्टेंबर: अंतरवली सराटीतून ११ वाजता मोर्चाला सुरुवात; पहिला मुक्काम पाटोदा (जि. बीड).
दुसरा,
१६ सप्टेंबर: दुसरा मुक्काम श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर).
तिसरा.
१७ सप्टेंबर: तिसरा मुक्काम हडपसर (पुणे).
तिसरा,
१८ सप्टेंबर: चौथा मुक्काम खोपोली (रायगड).
चौथा.
पाचव्या दिवशी.
१९ सप्टेंबर: सकाळी १० वाजता मोर्चा थेट मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानात धडकेल.उपोषणाला सुरुवात होणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.