‘Merlin Ventana’ Honoured at the National Level : मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीच्या बाणेर स्थित‘मर्लिन व्हेंटाना’ला प्रोजेक्ट ऑफ द इअर पुरस्कार’

उच्च दर्जाची रचना आणि जागतिक स्तरावरील लक्झरीचा अनुभव यांची दखल घेणारा असल्याचे मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीने म्हटले आहे.

0
‘Merlin Ventana’ Honoured at the National Level : मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीच्या बाणेर स्थित‘मर्लिन व्हेंटाना’ला प्रोजेक्ट ऑफ द इअर पुरस्कार”
‘Merlin Ventana’ Honoured at the National Level : मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीच्या बाणेर स्थित‘मर्लिन व्हेंटाना’ला प्रोजेक्ट ऑफ द इअर पुरस्कार”

‘Merlin Ventana’ Honoured at the National Level : नगर : लक्झरी रिअल इस्टेट (Luxury Real Estate) क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाच्या प्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीच्या ‘मर्लिन व्हेंटाना’ (‘Merlin Ventana’) या बाणेर, पुणे स्थित या प्रकल्पाने प्रतिष्ठेच्या 18 व्या रिऍलिटी प्लस वेस्ट रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह अँड एक्सलन्स अवॉर्डस् 2026 मध्ये ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ (‘Residential Project of the Year’) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला. मुंबईतील ताज सांताक्रूझ येथे बुधवार, 9 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात रिअल इस्टेट क्षेत्रातील विविध नामांकित व्यक्ती, विकासक आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते. 

नक्की वाचा : टंचाई सदृष्य परिस्थिती निवारणासाठी सूक्ष्म नियोजन करा : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

कंपनीने नमूद केले की

`मर्लिन व्हेंटाना`ला मिळालेला हा पुरस्कार प्रकल्पामागील दूरदर्शी विचार, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उच्च दर्जाची रचना आणि जागतिक स्तरावरील लक्झरीचा अनुभव यांची दखल घेणारा असल्याचे मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीने म्हटले आहे. ‘केवळ जागतिक दर्जाचे लक्झुरिअस घरे उभारणे नव्हे, तर जागतिक दर्जाचा ग्राहकाचा अनुभव निर्माण करणे’, या संकल्पनेतून `मर्लिन व्हेंटाना`ची उभारणी करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुणवत्ता व दर्जाची नवी उंची गाठण्याचा प्रयत्न (‘Merlin Ventana’ Honoured at the National Level)

या यशाबद्दल बोलताना मर्लिन भिंगरवाला डेव्हलपर्स एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मर्लिन ग्रुपचे व्यवस्थापकीय भागीदार कमलेश झवर भिंगरवाला यांच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला. प्रत्येक प्रकल्पामधून गुणवत्ता व दर्जाची नवी उंची गाठण्याचा प्रयत्न असून, मिळालेला हा पुरस्कार भविष्यात आणखी मानदंड निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना भिंगारवाले यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित व्यासपीठावर नवी ओळख

18 व्या रिऍलिटी प्लस वेस्ट रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह अँड एक्सलन्स अवॉर्डस् 2026 हा पश्चिम भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचा व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ‘वेस्ट 2035: द नेक्स्ट डीकेड ऑफ इंडियाज रियल इस्टेट लीडरशिप’ अशी होती. कार्यक्रमात ब्रँडेड रेसिडेन्सेस, अनुभवाधारित लक्झरी लिव्हिंग, रिअल इस्टेटमधील नवे गुंतवणूक पर्याय, पुनर्विकास, एआय आणि रिअल इस्टेट मार्केटिंग अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

`मर्लिन व्हेंटाना`ला मिळालेल्या ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ या पुरस्कारामुळे लक्झरी निवासी प्रकल्पांच्या क्षेत्रात `मर्लिन ग्रुप`च्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित व्यासपीठावर नवी ओळख मिळाली आहे. जागतिक दर्जाची संकल्पना, आधुनिक जीवनशैलीला अनुरूप सुविधा आणि उत्कृष्टतेचा सातत्यपूर्ण ध्यास यामुळे हा प्रकल्प रिअल इस्टेट क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.