Lakshman Hake : ‘ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हल्ले करणे हे मनोज जरांगे यांचे फस्ट्रेशन’; लक्ष्मण हाकेंची टीका

0
Lakshman Hake : 'ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हल्ले करणे हे मनोज जरांगे यांचे फस्ट्रेशन'; लक्ष्मण हाकेंची टीका

नगर : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांच्यावर काल (ता.११) रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, माझ्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हल्ले करणे, हे मनोज जरांगे (Manoj jarange) यांचे फस्ट्रेशन आहे. फस्ट्रेशन व्यक्त करून आरक्षण मिळणार नाही. जरांगेंना हे कळलं पाहिजे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा : पुण्यातील MPSC करणाऱ्या प्रथमेश देशमुखने जीवन का संपवल? सविस्तर वाचा 

‘कोणाचा जीव घेऊन किंवा हल्ले करुन आरक्षण घेता येत नाही’ (Lakshman Hake)

हाके म्हणाले की, आरक्षण मिळवण्यासाठी कायद्याचा किस पाडावा लागतो. सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागतं. मनोज जरांगे तू कोणाच्या नादाला लागतोय ते ध्यानात ठेव, तू एका मेंढपाळाच्या पोराच्या नादाला लागण्याच्या भानगडीत पडू नको.तुला पाठिंबा देणाऱ्यांचं राजकारण संपेल आणि तुझं काय होईल याचा तू विचार कर, ही लोकशाही आहे. इथं संविधान चालतं, कायदा चालतो. इथं कोणाचा जीव घेऊन किंवा हल्ले करुन आरक्षण घेता येत नाही किंवा देता नाही.

अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध; ९ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार हरकती

आपण लोकशाहीत राहतो, राजे रजवाडे, ९६ कुळी, ९२ कुळी, आम्ही क्षत्रिय हे तुझ्या घरात, असली दादागिरी आणि नौटंकी करुन महाराष्ट्राला वेठीस धरायच्या भानगडीत पडू नको. खूप दिवस झालं, दोन तीन वर्ष महाराष्ट्र सहन करतोय, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. सोलापूर जिल्ह्यातील अभिजीत पाटील, शहाजी पाटील, पुण्यापासून, जालना, बीड पर्यंत रोहित पवार, शरद पवार,भाजपचे सुरेश धस, नारायण कुचे ही सगळी मंडळी आहेत, या माणसांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला. ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केला, त्यांना ओबीसींनी का मतदान करावं. जेव्हा ही लोकं मतं मागायला येतील तेव्हा जाब विचारला जाईल, असं लक्ष्मण हाके म्हणाले.  

‘ह.भ.प. मनोजदादा जरांगे यांनी आता मुंबईला जाऊ नये’ (Lakshman Hake)

ह.भ.प. मनोजदादा जरांगे यांनी आता मुंबईला जाऊ नये, आता तुझं कुठला मंत्री ऐकणार नाही.मागच्या कुठल्या मंत्र्यांनी वगैरेंनी तुझ्या लोकांची राहायची, खायची सोय केली. आता दिल्लीला पण जाऊ नको, तू आता इराण,इराक, कुवैत, बलुचिस्तानला तिकडे निजामाच्या औलादी आहेत ना तिकडे तू पुरावा आणायला जा, हैदराबाद गॅझेटचा पुरावा इराणला मिळेल. ह.भ.प. मनोजदादा तुझं आता मुंबईत काय चालणार नाही, असं लक्ष्मण हाके म्हणाले.