Vishal Ganpati | श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा

0

Vishal Ganpati | नगर : गणेश चतुर्थीनिमित्त अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Vishal Ganpati) व त्यांच्या पत्नी गायत्री मुम्मका यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा धार्मिक व मंगलमय वातावरणात करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुम्मका सुदर्शन यांचे स्वागत

श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, पंडित खरपुडे, अशोक कानडे, पांडुरंग नन्नवरे, ज्ञानेश्वर रासकर, प्राध्यापक माणिकराव विधाते, नितीन पुंड, चंद्रकांत फुलारी, हरिभाऊ फुलसौंदर, विजय कोथिंबिरे, संजय चाफे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले की, अहिल्यानगरवासीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये माझ्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यामुळे मन प्रसन्न झाले. नगरवासीयांनीही पारंपरिक पद्धतीने, भक्तिभावाने, शांततेत व नियमांचे पालन करून आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

श्रीची प्राणप्रतिष्ठा

देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर म्हणाले की, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त पुढील दहा दिवस मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात तसेच धार्मिक व सामाजिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गणेशयाग, आरोग्य शिबिर तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. श्री विशाल गणेश मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असतात. भाविकांना श्रींचे दर्शन सुलभतेने व शिस्तबद्ध पद्धतीने घेता यावे, यासाठी देवस्थानच्या वतीने नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे, असे अभय आगरकर यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी आपल्या घरी श्रीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गणेशाची मूर्ती खरेदी केली तसेच ढोल पथकात जाऊन ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here