Two killed after being hit by a dumper truck : येवला येथे डंपरच्या धडकेत कोपरगावातील दोघांचा जागीच मृत्यू

Two killed after being hit by a dumper truck : येवला येथे डंपरच्या धडकेत कोपरगावातील दोघांचा जागीच मृत्यू

0

Two killed after being hit by a dumper truck : कोपरगाव : येवला शहरातील फत्तेबुरुज नाका परिसरात आज रविवार दिनांक दुपारी १२ वाजेच्या सुमारास डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Horrific Accident) कोपरगावातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू (Two killed after being hit by a dumper truck) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आसिफ नूर महम्मद शेख आणि सैफ रफिक शेख दोघेही रा. संजयनगर, कोपरगाव, अशी मयतांची (Dead) नावे आहेत.

भरधाव डंपरची जोरदार धडक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फत्तेबुरुज नाका परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही दुचाकीवरून रस्त्यावर कोसळले आणि डंपरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वाहतूक विस्कळीत (Two killed after being hit by a dumper truck)

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. येवला शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची वर्दळ आणि अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कसा घडला, याबाबतचा पुढील तपास सुरू असून संबंधित डंपर चालकाविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here