Robbed at knifepoint : नगर : भिंगार (Bhingar) शहरातील एका व्यक्तीला जणांनी धारदार शस्राचा धाक दाखवून (Robbed at knifepoint) 5 हजार 600 रुपयांना लुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) संबंधित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
दि. 18 सप्टेंबर रोजी संतोष गोवर्धन पवार रा. कासारवाडी भिंगारला बाजारहाट आणण्यासाठी आले होते. पवार घरी निघाले असता प्रिन्स लॉन्ससमोर आरोपी सनी शंकर निकाळजे, अभिलेख धर्मेंद्र वाघेला, विकी भालेराव रा. भिंगार हे तिघेही पाठलाग करीत आले. पवार यांना गाडी आडवी लावून धारदार शस्राचा धाक दाखवून खिशातून 5 हजार 600 रुपये काढून घेतले. या घटनेनंतर पवार यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चांदबीबी महाल परिसरात सापळा (Robbed at knifepoint)
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र फिरवत आरोपींच्या ठिकाणाचा सुगावा घेतला. संबंधित आरोपी चांदबीबी महालाच्या झाडाझुडपात लपून बसल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चांदबीबी महाल परिसरात सापळा रचून शिताफीने आरोपींना ताब्यात घेत अटक केलीय.!
दरम्यान, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सुहास आव्हाड, दीपक शिंदे, रवींद्र टकले कैलास सायंबर, कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे, वैभव झिने, संदीप थोरात, राहुल गुंडू, अरुण सांगळे यांनी कारवाई केली.



