Shivdurg Trekkers : शिवदुर्गच्या माध्यमातून सुदृढ युवा पिढी घडतेय – राजेश इंगळे‘; ‘शिवदुर्ग’ची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

0
Shivdurg Trekkers : शिवदुर्गच्या माध्यमातून सुदृढ युवा पिढी घडतेय - राजेश इंगळे‘; 'शिवदुर्ग’ची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
Shivdurg Trekkers : शिवदुर्गच्या माध्यमातून सुदृढ युवा पिढी घडतेय - राजेश इंगळे‘; 'शिवदुर्ग’ची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Shivdurg Trekkers : नगर : गडकिल्ल्यांच्या ट्रेकिंगच्या माध्यमातून तरुणांमध्ये शारीरिक सुदृढता, आरोग्याबाबत जागरूकता आणि ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान निर्माण होत आहे. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सुदृढ युवा पिढी घडत असून, तरुणांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ल्यांचा वारसा आणि संस्कृती जपण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले. गडकिल्ले ट्रेकिंग आणि वारसा संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा बेलवंडी कोठार येथील काशीबारव परिसरातील साई मंगल कार्यालय येथे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेला अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील संस्थेचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

 निमित्त डिंभे-माणिकडोह बोगद्याचे; बैठक मात्र जिल्हा बँकेची! नेत्यांच्या वादात शेतकरी प्रश्नाला बगल

सभेच्या प्रारंभी अजित दळवी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या वर्षभरातील उल्लेखनीय उपक्रमांचा आढावा सचिव सोमेश शिंदे यांनी मांडला. उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर आणि संकेत नलगे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची पायधूळ घेणे, मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवणे आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राखणे, यासाठी तरुणांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ट्रेकिंगला प्राधान्य द्यावे. ट्रेकिंगच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचा इतिहास, संस्कृती आणि वारसा संवर्धनाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी, या उद्देशाने सभेत विविध ठराव संमत करण्यात आले. केवळ सह्याद्रीतील गडकिल्ल्यांवर भटकंती न करता स्थानिक ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक ठेवे आणि वारसास्थळांच्या जतनासाठीही तरुणांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश या सभेतून देण्यात आला.

‘आदर्श शिवदुर्ग मावळा व रणरागिणी’ पुरस्काराने सन्मान

शिवदुर्ग परिवारातील प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यातून आणि शिवविचारांतून मोठी आहे. आजही जतन करणे बाकी असलेला ऐतिहासिक वारसा संवर्धित करण्याची जबाबदारी आपली आहे. समाजात अनेकदा दुर्लक्षित राहणारे निःस्वार्थी कार्य शिवदुर्गची तरुण पिढी करत आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. अल्पवयातच वारसा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तनिष्का मोरे, त्रिवेणी कडूस, प्रतिभा इथापे, दिगंबर भुजबळ, सचिन भोसले आणि चेतन चौधरी या सहा तरुणांना ‘आदर्श शिवदुर्ग मावळा व रणरागिणी’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माकडाचा शाही मसाज; व्हिडीओ व्हायरल

यांची उपस्थिती (Shivdurg Trekkers)

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंती करणारी आणि त्याचबरोबर स्थानिक ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेणारी तरुणाई शिवदुर्ग परिवाराच्या माध्यमातून घडत आहे. या कार्यातून इतिहासाविषयी आस्था, सामाजिक बांधिलकी आणि संवर्धनाची जाणीव नव्या पिढीत रुजवली जात असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सभेला साईकुमार शिंदे, दिगंबर भुजबळ, अमोल बडे, रमेश चांदगुडे, तारा चांदगुडे, सुनील मोरे, अर्चना मोरे, मिठू लंके, सुचित्रा दळवी, त्रिवेणी कडूस, विजया लंके, दिनेश अडसूळ, राकेश अग्रवाल, तुषार चौधरी, प्रणव गलांडे, चेतन चौधरी, आविष्कार इंगळे, अक्षिका इंगळे आणि स्वाती मुळे यांच्यासह सदस्यांनी सहभाग नोंदवला. सभेचे सूत्रसंचालन मारुती वागसकर आणि प्रा. भरत खोमणे यांनी केले, तर नवनाथ गोरे यांनी आभार मानले. नियोजन टीममधील ईश्वर कोठारे, अक्षय ओहळ, सागर शिंदे, नीरज पाडळे, सोनू शिंदे आणि गौतम निकम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.