
Code-Red : नगर : पुणे शहर लगतच्या वाघोली परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. मिरवणुकांमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंगळवारी (ता. २२) दुपारी ३ वाजल्यापासून बुधवारी (ता. २३) पहाटे २ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी काढले आहेत.
पर्यायी मार्गाचा अवलंब करावा (Code-Red)
पर्यायी मार्गाचा अवलंब करून गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनाचा दिवस शांततेत पार पडावा आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नागरिकांनी, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन भाजीभाकरे यांनी केले.
आठवडे बाजार बंद
त्याचबरोबर, मंगळवारी विसर्जनाचा नववा दिवस आल्याने आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, दैनंदिन बाजार दुपारी तीन वाजल्यानंत बंद राहणार आहे. पुणे महापालिके याबाबतचे पत्र काढले आहे.
ट्रॅव्हल्स बस, जड वाहतुकीसाठी
पुण्यातून नगर रस्तामार्गे छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस यांनी सादलबाबा चौक चंद्रमा चौक-विश्रांतवाडी-आळंदी शिक्रापूर मार्गाचा वापर करावा.
नगर रस्त्याने मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस यांनी शिक्रापूर चाकणमार्गे मुंबई या मार्गाचा वापर करावा. नगर रस्त्याने पुणे शहरात येणाऱ्या बसेस यांनी लोणीकंद येथून थेऊर फाटा केसनंद गावमार्गे थेऊर फाटा सोलापूर रस्ता मार्गाचा वापर करावा.
हलक्या चारचाकी वाहनांसाठी
अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने ही थेऊर फाटा, लोणीकंद गाव, केसनंद, थेऊरगाव, थेऊर फाट्यावरुन सोलापूर रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जातील.
पुण्याकडून शिरुर, अहिल्यानगरकडे जाणारी वाहने वाघेश्वर चौकातून डावीकडे वळून भावडीगांव मार्गे, पुणे अहिल्यानगर महामार्ग सुरभी माथा (लोणीकंद) या ठिकाणाहून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.


