MPSC : पाथर्डी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत मढी (ता. पाथर्डी) येथील अनुजा हरिदास मरकड यांची महसूल सहायक पदावर निवड झाली. या यशाबद्दल आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या हस्ते अनुजा मरकड (Anuja Markad) यांचा सत्कार करण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुजा मरकड यांचे यश प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या बळावर स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते, हे अनुजा यांच्या यशातून स्पष्ट झाले आहे.
नक्की वाचा : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभासाठी उमेदवारांना पूर्व मुलाखत प्रशिक्षण
यांचा उपस्थिती
यावेळी कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, हरिश्चंद्र मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, सचिव माधुरी मरकड, विश्वस्त उषा मरकड, मदन मरकड, उत्तम मरकड, महादेव कोकाटे, अनिल साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुभाष बर्डे, विष्णुपंत अकोलकर, धीरज मैड, पुरुषोत्तम आठरे, रवींद्र वायकर, भगवान मरकड, राधाकिसन मरकड, रवींद्र आरोळे, भाग्येश मरकड, अण्णासाहेब मरकड, बाळासाहेब मरकड, वैभव देशमुख, विष्णू मरकड, चंद्रभान पाखरे, उद्धव ससे, सुनील कदम, पोपट टघोरपडे, ट्रस्टचे व्यवस्थापक संजय मरकड आदी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांचे मार्गदर्शन लाभले (MPSC)
अनुजा मरकड या मढी येथील अशोक महाराज मरकड यांच्या सुनबाई असून अनुजा हिला उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, पती हरिदास मरकड यांचे मार्गदर्शन लाभले. उपजिल्हाधिकारी गणेश मरकड व पत्रकार शिवदास मरकड यांच्या भावजय आहेत.



