Shrirampur Lepord News : श्रीरामपूरच्या ‘रणरागिणी’ आईचे धाडस, लेकासाठी बिबट्याशी थेट भिडली!

0
Shrirampur Lepord News : श्रीरामपूरच्या 'रणरागिणी' आईचे धाडस, लेकासाठी बिबट्याशी थेट भिडली!
Shrirampur Lepord News : श्रीरामपूरच्या 'रणरागिणी' आईचे धाडस, लेकासाठी बिबट्याशी थेट भिडली!

नगर : श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण-खानापूर रोडवर (Shrirampur Lepord News) एक थरारक घटना घडली आहे. शेतात दुचाकीवरून जाणाऱ्या माय-लेकांवर बिबट्याने अचानक हल्ला (Leopard attacks mother and son) केला. मात्र, संकटाच्या क्षणी ६५ वर्षांच्या आईने दाखवलेले धैर्य आणि हातातील धारदार विळ्याने बिबट्यावर केलेला प्रतिहल्ला यामुळे दोघांचाही जीव वाचला आहे. या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

नक्की वाचा : लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

मायलेकरांवर बिबट्याने केला हल्ला (Shrirampur Lepord News)

श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे सकाळी दुचाकीवर शेतात जात असलेल्या मायलेकरांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. ही घटना भामाठाण-खानापूर रोड परिसरात घडली. यावेळी ६५ वर्षीय आईने धारदार विळ्याने बिबट्याचा प्रतिकार करत दोघांचाही जीव वाचला. रावसाहेब हरिश्चंद्र वाघ (वय ३६) व ताराबाई हरिश्चंद्र वाघ (वय ६५) असे जखमींचे नाव आहे. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास दोघेही दुचाकीवरुन भामाठाण-खानापूर रोडने आपल्या शेताकडे चालले होते. शेतीकडे जात असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली आणि क्षणार्धात दुचाकीसह दोघे मायलेक रस्त्याच्या कडेला पडले. तेवढ्यात ताराबाई बिबट्याच्या तावडीत सापडल्या. दोघांचीही झटापट सुरू झाली.

हेही पहा : नगरच्या झेडपी सोसायटीत सुकामेव्यात साकारले बाप्पा!

जखमींवर अहिल्यानगरमध्ये उपचार  (Shrirampur Lepord News)

या झटापटीत ताराबाई यांनी हातात असलेल्या धारदार विळ्याने बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरवात केली. आईचा प्रतिकार आणि आरडाओरडा ऐकून मदतीला धावून आलेल्या मुलामुळे बिबट्याने लगेच पळ काढला. मात्र, यामध्ये बिबट्याने आपल्या पंजाने ताराबाई यांच्या डोक्यावर, हातावर व कानावर गंभीर जखमा केल्या. दुचाकीवरून पडल्याने ताराबाईंचा मुलगा रावसाहेब वाघ सुद्धा किरकोळ जखमी झाले. या दोन्ही जखमींना अहिल्यानगरला उपचारासाठी आणण्यात आले आहे.