
Kotwali Police Station : नगर : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा (Banned Gutkha) आणि सुगंधित तंबाखूची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) रंगेहात पकडले. विनायकनगर परिसरातील झारेकरी मोटर्स वर्कशॉपच्या डाव्या बाजूला, नगर-पुणे रोडलगत रविवारी (ता. २०) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून गुटखा, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण ५२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्सार अबरार सय्यद (वय ३३, रा. दर्गा दायरा, जिल्हा परिषद शाळेजवळ, मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय बातमीदारामार्फत माहिती
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना रविवारी सायंकाळी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा घेऊन विनायकनगर परिसरात विक्रीसाठी थांबला आहे. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर दोन पंचांसह घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रतिबंधित गुटखा, व्ही-१ तंबाखूचा साठा आढळला(Kotwali Police Station)
पोलिसांना घटनास्थळी संशयित व्यक्ती मोपेडवर पांढऱ्या रंगाची गोणी घेऊन थांबलेला आढळला. पंचांसमक्ष त्याची चौकशी करून गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि व्ही-१ तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली मोपेड जप्त केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सुरज कदम यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पांडुरंग मेढे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाने करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोहेकॉ विनोद बोरगे, पोलीस कॉन्स्टेबल सुरज कदम, सचिन लोळगे, अतुल लाटे, रोहित ठोंबे आणि मपोकाँ बागवान यांच्या पथकाने केली आहे.


