Shrirampur News : शहीद पतीचा वारसा,श्रीरामपूरमधील वाळू तस्करांवर कल्पना पवारांची सर्जिकल स्ट्राईक

0
Shrirampur News : शहीद पतीचा वारसा,श्रीरामपूरमधील वाळू तस्करांवर कल्पना पवारांची सर्जिकल स्ट्राईक

नगर : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिस हवालदार अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना यांची परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकपदी येथे नियुक्ती होताच त्यांनी वाळू तस्करांविरुद्ध मोर्चा उघडला आहे. त्यामुळे श्रीरामपूरमधील (Shrirampur News) बेकायदा वाळू तस्करी (Illegal sand smuggling) आणि दारू विक्री (Liquor sales) पवार यांच्या रडारवर आली आहे.

नक्की वाचा : श्रीरामपूरच्या ‘रणरागिणी’ आईचे धाडस, लेकासाठी बिबट्याशी थेट भिडली!

देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश (Shrirampur News)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश पारित केले होते. पती अंबादास पवार यांच्याप्रमाणे त्यांनाही देशसेवेची संधी यातून मिळाली आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अंबादास पवार हे सीएसटी रेल्वे स्थानकावर शहीद झाले होते. सीएसटीवर निघालेल्या अंबादास पवार यांचे त्यावेळी पत्नी कल्पना यांच्याशी फोनवर बोलणे सुरू होते. सीएसटी स्थानकावर पोहोचताच त्यांनी फोनवर फटाक्यांचा आवाज येत असल्याचे पत्नीला सांगितले. त्यावेळी दहशतवाद्यांची तेथे नियुक्त पोलिसांशी चकमक सुरु होती. पवार हे स्थानकावर उतरताच त्यांचाही दहशतवाद्यांशी सामना झाला. याच वेळी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पवार हे शहीद झाले होते.

अवश्य वाचा : राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, १२ जागांसाठी निवडणूक, भाजपचे आठ खासदार होणार निवृत्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल २०२५ मध्ये कल्पना पवार यांच्या परिविक्षाधीन नियुक्तीला मंजुरी दिली होती. दहशतवाद्यांशी लढताना अंबादास पवार शहीद झाल्यानंतर विशेष आदरपूर्वक निकषांवर आधारित नियुक्तीचा हा निर्णय सरकारने घेतला. त्यांना पोलिस उपअधीक्षक हे पद दिले. सरकारने मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना शासकीय पदांवर सामावून घेतले आहे. यामध्ये शहीद तुकाराम ओंबळे यांच्या मुलीचाही समावेश आहे.

कल्पना पवार नेमक्या कोण? (Shrirampur News)

कल्पना पवार या मूळच्या पुणे जिल्ह्यातील निरा येथील आहेत. डिसेंबरपर्यंत त्या श्रीरामपूर येथे सेवा बजावणार आहेत. यादरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या तालुका पोलिस ठाण्याचे कामकाज पाहत आहेत. गोदावरी नदीपात्रातील वाळू तस्करांविरुद्ध त्यांनी धडक मोहीम उघडली आहे.