SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री! 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला शेअर

SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री! 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला शेअर

0
SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री! 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला शेअर
SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री! 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला शेअर

SS Retail IPO : मोबाइल फोन, ॲक्सेसरीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या SS Retail (SS Retail IPO) या मल्टी-ब्रँड रिटेल चेनच्या आयपीओची शेअर मार्केटमध्ये (Stock Market IPO) धमाकेदार एन्ट्री झाली आहे. कारण हा शेअर 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला आहे. यामध्ये बीएसईमध्ये 50.73 टक्के प्रीमियमसह 639.10 रूपयांना लिस्ट झाला. तर एनएसईमध्ये 47.17 टक्के प्रीमियमसह 624 रूपयांना लिस्ट झाला. तर या आयपीओची किंमत 424 रूपये होती. तेव्हाच या मल्टी-ब्रँड रिटेल चेनच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा (Investors) उंदड प्रतिसाद मिळाला होता. 500 कोटींचा आयपीओ तब्बल 107.41 पट सब्सक्राइब झाला होता.

दुसरीकडे मात्र या धमाकेदार एन्ट्रीनंतर या कंपनीचे शेअर घसरल्याचं पाहायला मिळालं. कंपनीचे शेअर्स बीएसईवर घसरून 603 रुपयांवर पोहोचले आहेत. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) एसएस रिटेलचे शेअर्स 603.05 रुपयांवर व्यवहार करत आहेत. आयपीओपूर्वी एसएस रिटेल लिमिटेडमध्ये प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपची हिस्सेदारी 75.74 टक्के होती. आता ही हिस्सेदारी 64.85 टक्क्यांवर आली आहे. त्याचवेळी कंपनीतील पब्लिक शेअरहोल्डिंग वाढून 35.15 टक्क्यांवर पोहोचले आहे. सिद्धार्थ गुणवंत शाह, दीपा सिद्धार्थ शाह, हर्षल किशोर पारिख आणि भाविनी हर्षल पारिख हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

IPOमधून किती शेअर्स जारी झाले?

SS Retailच्या IPOमध्ये 360.75 कोटींचे 85.08 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले. याशिवाय 140 कोटींच्या 33.02 लाख शेअर्सचा ऑफर फॉर सेल (OFS) करण्यात आला. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ₹146.40 कोटी उभारले आहेत. आयपीओचा प्राइस बँड 403 ते 424 प्रति शेअर होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

SS Retail कंपनी काय करते? (SS Retail IPO)

SS Retail ही मोबाइल फोन, ॲक्सेसरीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणारी मल्टी-ब्रँड रिटेल चेन आहे. कंपनी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये कार्यरत आहे. कंपनीचा मुख्य भर टियर-2, टियर-3 आणि त्यापेक्षा छोट्या शहरांवर आहे. SS Mobile, Mobile Exchange Wala आणि The Mobile Space या ब्रँडच्या माध्यमातून कंपनी स्टोअर्स चालवते.

मिळालेला पैसा कुठे वापरणार?

नवीन शेअर्सच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा वापर आर्थिक वर्ष 2027 आणि 2028 मध्ये नवीन स्टोअर्स सुरू करणार आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये SS Retailचा महसूल 47 टक्क्यांनी वाढून 2,352.85 रुपये कोटी झाला. कंपनीचा निव्वळ नफा देखील 49 टक्क्यांनी वाढून 59.28 रुपये कोटी झाला. याआधी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीचा महसूल 1,599.96 रुपये कोटी, तर निव्वळ नफा 39.86 रुपये कोटी होता.