Life Imprisonment : नगर : पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेऊन साडीने गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली पतीला आजीवन कारवास (Life Imprisonment) आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे (S. B. Kachare) यांनी हा निकाल दिला. रात्रीच्या अंधारात एमआयडीसीमधील (MIDC) सुरक्षा रक्षकाच्या खोलीत घडलेला हा गुन्हा सिद्ध करणे तपास यंत्रणेच्या दृष्टीने आव्हानात्मक होते. पोलिसांचा तपास आणि अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मंगेश दिवाणे यांनी केलेला युक्तिवाद आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन गेला.
नक्की वाचा : स्थायी समितीच्या सभेत ३३ रस्त्यांसह विविध विकासकामांना मंजुरी
साडीने गळा आवळून खून
संतोष परसराम पटोरकर (वय ३२ वर्षे, रा. बिबामल, ता. धारनी जि. अमरावती) असे यामध्ये शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. एप्रिल 2021 मध्ये हा गुन्हा घडला. आरोपी पाटोरकर नगरच्या एमआयडीसीमध्ये कामासाठी मुकादमासोबत आला होता. सोबत त्याची पत्नी आणि 4 वर्षांची मुलगीही होती. त्या दिवशी रात्री त्याने कुटुंबासह सेक्युरीटी केबिनमध्ये मुक्काम केला. त्याचा पत्नीवर आधीपासूनच संशय होता. त्यातूनच रात्री तेथे कोणी नसल्याचा गैरफायदा उठवत त्याने पत्नीचा तिच्याच साडीने गळा आवळून खून केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
घटनास्थळ पंच यांची साक्ष ठरली महत्वाची (Life Imprisonment)
ही घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक युवराज अरविंद आठरे यांनी तपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये सरकारतर्फे बाजू मांडताना अॅड. दिवाणे यांनी सात साक्षीदार न्यायालयापुढे सादर केले. त्यामध्ये अनिता कुलट, सुमन काळापाड, गणेश तुकाराम काळोखे, कंपनीचे मालक सागर ब्रिजमोहन बक्षी, सहायक फौजदार मोहम्मद उमराव शेख, वैद्यकीय अधिकारी प्रसाद लक्ष्माण सायगावकर, घटनास्थळ पंच यांची साक्ष महत्वाची ठरली.
सीसीटीव्हीचे चित्रिकरण आणि सरकार पक्षाचा भरभक्कम पुरावा व युक्तिवाग ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिली. या खटल्यात सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी व पोलिस अंमलदार एस. के. गुंजाळ यांनी सहकार्य केले.



