Double Murder : वृद्धाश्रमात चिडविण्याच्या रागातून दोघांचा खून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपीची आज वृद्धाश्रमातून बहिणीकडे होणार होती रवानगी

0
Double Murder : वृद्धाश्रमात चिडविण्याच्या रागातून दोघांचा खून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Double Murder : वृद्धाश्रमात चिडविण्याच्या रागातून दोघांचा खून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Double Murder : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे (MIDC Police Station) हद्दीत असलेल्या एका वृद्धाश्रमातच एका वृद्धाने आपल्या सहकारी वृद्धांचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विळद घाट (Vilad Ghat) परिसरामध्ये असलेले “मातोश्री” वृद्धाश्रमात ही धक्कादायक घटना घडली. संबंधित आरोपीचा उजवा हात सतत थरथरत होता, यावरून इतर सहकारी त्याला नेमकी चिडवत होते याचाच राग मनात धरून त्याने हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या मारहाणीमध्ये दोघांचा मृत्य झाला. गणेश घोडके, बाळासाहेब घाडगे, गोरख फुंदे, साहेबराव भवर, लिंबराज फिसके, संतोष पिरगल हे वृद्ध जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

नक्की वाचा : स्वीडन कुठ हे त्यांना माहिती नाही; डॉ. सुजय विखे यांचा लंकेंना टोला

एकाची प्रकृती चिंताजनक

याबाबत माहिती अशी की, अहिल्यानगरच्या मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या राजू तुकाराम घुले नामक व्यक्तीने पहाटे सहाच्या सुमारास वृद्धाश्रमातील काही वृद्धांवर हातातील लोखंडी काठीने अचानकपणे हल्ला केला. या घटनेमध्ये मंकाळेश्वर हेणे आणि दत्तात्रेय हारके यांचा मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले.जखमींना उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल होत या घटनेची तपासणी सुरू केली आहे.

ज्या हत्याराने दोन वृद्धांना मारहाण करण्यात आली ते देखील हस्तगत करण्यात आले आहे. राजू घुले या आरोपीने झोपेतच असलेल्या आपल्या सहकारी वृद्धांवर हल्ला चढवला. हातातील लोखंडी काठीने डोक्यात आणि पायावर वार केल्याने मातोश्री वृद्धाश्रमात सर्वच रक्तच रक्त पसरले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पहाटेच्या वेळेला सहकाऱ्यांवर हल्ला (Double Murder)

याबाबत वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपीचा उजवा हात सतत थरथरत होता, यावरून इतर सहकारी त्याला नेमकी चिडवत होते याचाच राग मनात धरून त्याने हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या मारहाणीमध्ये दोघांचा मृत्यू झाला गणेश घोडके , बाळासाहेब घाडगे , गोरख फुंदे , साहेबराव भवर , लिंबराज फिसके, संतोष पिरगल हे वृद्ध जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावठाण, कुंभारी येथील असल्याची माहिती देण्यात आलीये. आरोपी हा 3 नोव्हेंबर 2025 पासून मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव्यास होता आरोपी हा अविवाहित असून त्याचे भाचे प्रयाग सानप यांनी त्याला वृद्धाश्रमात आणले होते.

विशेष म्हणजे आरोपीची आज वृद्धाश्रमातून बहिणीकडे रवानगी होणार होती आरोपीचे बहीण नाशिक होऊन त्याला घेण्यासाठी नगरला येत होती. मात्र त्याआधीच आरोपीने पहाटेच्या वेळेला आपल्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवला आणि दोघांचा खून केला पोलीस या घटनेच्या पुढील तपास करत आहेत.