Rohit Pawar : दुष्काळ जाहीर झाला, आता सरसकट मदत द्या; रोहित पवारांची मागणी

0
Rohit Pawar : दुष्काळ जाहीर झाला, आता सरसकट मदत द्या; रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar : दुष्काळ जाहीर झाला, आता सरसकट मदत द्या; रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar : संगमनेर : राज्यात १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ असल्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) स्वतः सांगत आहेत. मात्र दुष्काळ (Drought) जाहीर करूनही शेतकरी आणि शेतमजुरांच्या हातात प्रत्यक्ष मदत पोहोचत नसल्याची टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही, तातडीने सरसकट मदत जाहीर करावी; अन्यथा सरकारला हे महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

३५ हजार कोटी रुपयांची घोषणा

मागील वर्षी अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असा दावा पवार यांनी केला. ३५ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्यातील सुमारे ११ हजार कोटी रुपयेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी म्हटले. सरकारच्या घोषणा पाण्यात येणाऱ्या बुडबुड्यांसारख्या ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली.शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जात नाही, तोपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले. सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तो केवळ शो होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा : वृद्धाश्रमात चिडविण्याच्या रागातून दोघांचा खून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सर्व नेत्यांनी एकत्र यावे (Rohit Pawar)

भाजपचे आमदार मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त कोट्यवधी रुपयांची उधळण झाल्याचा आरोप करत, हा पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला असता तर त्याचा फायदा झाला असता, असे पवार म्हणाले. आमदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण नसल्याचे यातून दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.
दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण न करता केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पवार यांनी केले. शरद पवार यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्या. केंद्राकडून मदत मिळणार असेल तर आम्हीही सोबत येण्यास तयार आहोत; मात्र शेतकऱ्यांसाठी मदत आणा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मागील वर्षी अतिवृष्टीच्या मदतीमध्ये गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी मदत मिळाल्याचा दावाही पवार यांनी केला. केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी सर्व नेत्यांना एकत्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, पंढरपूर येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते आंदोलन करत असून, रयत संस्थेचा नियोजित कार्यक्रम असल्याने आपण संगमनेरमध्ये आलो असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. विविध ठिकाणी भेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.