Gold Chain Theft | गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरी करणारी टोळी गजाआड; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

Gold Chain Theft | नगर : पाथर्डी ( Pathardi ) तालुक्यातून अहिल्यानगर शहरात येऊन गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी ( Gold Chain Theft ) करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (ता. २७) गजआड केले. पथकाने चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा पाच लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

हे वाचा – दुष्काळ जाहीर झाला, आता सरसकट मदत द्या; रोहित पवारांची मागणी

गर्दीचा फायदा घेत चोरी ( Gold Chain Theft )

नागपंचमी सणानिमित्त १७ ऑगस्ट रोजी देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंध घालण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोनसाखळी चोराची माहिती घेत असताना त्यांना कळाले की, अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथे नागपंचमी सणाच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन पांडुरंग मासाळकर याने त्याचे साथीदारासह मंगळसूत्र चोरी केले आहे. तो व त्याची टोळी तिसगावमधील शिवशक्ती केटरिंग समोर बसलेले आहेत. पथकाने सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले.

नक्की वाचा : वृद्धाश्रमात चिडविण्याच्या रागातून दोघांचा खून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चार आरोपी ताब्यात ( Gold Chain Theft )

यात पांडुरंग सोन्याबापू मासाळकर (वय ४६, रा.विजयनगर, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर, राजेंद्र दामू माने (वय ३७, रा.नाथनगर, पाथर्डी), नारायण दशरथ गायकवाड (वय ४०, रा.एकनाथवाडी, ता.पाथर्डी) व हिरालाल सुखदेव जाधव (वय ४२, रा.मिडसांगवी, ता.पाथर्डी) या आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्यांनी मागील महिन्यात नागपंचमी सणाच्या वेळी अहिल्यानगर शहरातील नालेगाव, संगमनेर तालुक्यातील पारगाव येथे यात्रेच्या वेळी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व मे महिन्यामध्ये संगमनेर येथे गगनगिरी महाराज सप्ताहाच्या कार्यक्रमा दरम्यान तीन व्यक्तींच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याची माहिती दिली. ताब्यातील आरोपीतांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्याचे अभिलेख पडताळून तोफखाना, संगमनेर शहर व संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचे प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोपी पांडुरंग मासाळकर याने चोरी केलेले सोन्याचे दागिने पाथर्डी येथील एका पडक्या खोलीत ठेवल्याची माहिती दिली. तसेच पांडुरंग मासाळकर याने हे दागिने पथकाला काढून दिले. पथकाने हा पाच लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपासासाठी आरोपींना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here