FDA | नगर : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन ( FDA ) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोफेसर कॉलनी चौकातील विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलची स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांनी खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता तसेच किचनमधील स्वच्छतेची पाहणी करून खाद्यपदार्थ व्यवसायिकांना आवश्यक सूचना दिल्या. खाद्यपदार्थ दर्जेदार ठेवण्यासह किचन स्वच्छ ठेवावे, कुकने आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच दुकानाचा परवाना दर्शनी भागावर लावावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. भविष्यात या नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. प्रदीप पवार यांनी दिला.या मोहिमेत हायजिन फर्स्ट संस्थेचा पुढाकार होता. यावेळी संस्थेच्या संस्थापिका वैशाली गांधी, रूपाली बिहानी, अनुराधा रेखी, विकास जाधव, तुषार भंडारी आदी उपस्थित होते.
हे वाचा – दुष्काळ जाहीर झाला, आता सरसकट मदत द्या; रोहित पवारांची मागणी

स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती ( FDA )
हायजिन फर्स्ट संस्थेच्या संस्थापिका वैशाली गांधी म्हणाल्या की, प्रोफेसर कॉलनी चौक हा ‘हायजिन चौक’ करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. अन्नसुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तपासणी करून संबंधित व्यवसायिकांना स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नगरकरांना स्वच्छ, सुरक्षित आणि हायजिनिक खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी हायजिन फर्स्ट संस्था शहरात सातत्याने काम करत आहे. खाद्यपदार्थ व्यवसायिकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे वैशाली गांधी यांनी सांगितले.
नक्की वाचा : वृद्धाश्रमात चिडविण्याच्या रागातून दोघांचा खून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावे ( FDA )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची असून त्याचे कौतुक केले पाहिजे. हायजिन फर्स्ट संस्था गेल्या अकरा वर्षांपासून शहरातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी समाजामध्ये तसेच खाद्यपदार्थ व हॉटेल व्यावसायिकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम करत आहे. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी संस्थेकडून करण्यात येणारे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे बारस्कर यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
रूपाली बिहानी म्हणाल्या की, प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. या स्टॉलची स्वच्छता राखणे तसेच नागरिकांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे ही खाद्यपदार्थ व्यावसायिकांची जबाबदारी आहे. नागरिकांना चांगले आणि स्वच्छ खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी हायजिन फर्स्ट संस्था सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.



