World Rabies Day : अहिल्यानगर : जागतिक रेबीज दिनाचे (World Rabies Day) औचित्य साधून आज दि. २८ सप्टेंबर रोजी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, जुने बस स्थानक, अहिल्यानगर व जायंटस् ग्रुप ऑफ अहिल्यानगर (Giants Group of Ahilyanagar) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अँटी रेबीज लसीकरण (Anti-rabies vaccination) व जंतनाशक औषध वाटप शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यांचे मार्गदर्शन लाभले
या कार्यक्रमास डॉ. उमेश पाटील, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि डॉ. मुकुंद राजळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, जिल्हा पशू सर्व चिकित्सालय Giants वेलफेयर फॉउंडेशन चे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
७० हून अधिक पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी (World Rabies Day)
यावेळी डॉ. अमोल जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ. प्रशांत लोंढे, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ. सुधाकर गिते, फिरते पशुवैद्यकीय दवाखाना नगर, डॉ. उत्कर्ष कातकडे, निर्बीजीकरण केंद्र नगर Giants चे अभय मुथा, अनिल गांधी, दीपक मुथा, दर्शन गुगळे , संजय कवीटकर, व्रणोपचारक हे उपस्थित होते.
तसेच खाजगी सेवादाता कार्तिक शिंगाटे, गणेश गव्हाणे, विशाल ढगे, प्रणव गडाख, मानस चितांबर, कांचन कवडे, तन्मय शेवाळे, जगदीश बोरुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरात ७० हून अधिक पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करून मोफत रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. यावर्षीची थीम “Stronger Together – एकत्रितपणे अधिक मजबूत” अशी होती.



