FDA Action : जिल्हा बँकेच्या जेवणावळीवर ‘एफडीए’ची कारवाई; केटरर्सकडे परवानाच नाही!

0
FDA Action : जिल्हा बँकेच्या जेवणावळीवर 'एफडीए'ची कारवाई; केटरर्सकडे परवानाच नाही!
FDA Action : जिल्हा बँकेच्या जेवणावळीवर 'एफडीए'ची कारवाई; केटरर्सकडे परवानाच नाही!

FDA Action : नगर : जिल्हा सहकारी बँकेच्या (ADCC Bank) सर्वसाधारण सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या सुमारे दोन हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करणाऱ्या एका केटरर्सकडे अन्न व्यवसायाचा परवाना नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत समोर आले आहे. एफडीएच्या (FDA Action) पोर्टलवर कोणतीही नोंद न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) संबंधित केटरर्सला नोटीस बजावून अन्न व्यवसायाचा परवाना प्राप्त होईपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सभेसाठी येणाऱ्या उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था

जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.२८) आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी येणाऱ्या उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था केशर गुलाब मंगल कार्यालय, आनंदधाम रोड येथे करण्यात आली होती. या भोजन व्यवस्थेचा ठेका एका केटरर्सला देण्यात आला होता. सुमारे दोन हजार लोकांसाठी भोजन तयार करण्याचे काम संबंधित केटरर्सकडून करण्यात येत होते. दरम्यान, त्या केटरर्सकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गौरव जगताप यांना मिळाली. तसेच, सणासुदीच्या काळात एफडीए पोर्टलवर कोणतीही नोंद न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात भोजनाची व्यवस्था केल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर सहायक आयुक्त जगताप यांनी अन्न सुरक्षा अधिकारी साजिदा मुल्ला यांच्यासह संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अन्न व्यवसाय परवाना उपलब्ध नसल्याचे स्पष्ट (FDA Action)

पाहणीदरम्यान त्या केटरर्सकडे अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत आवश्यक असलेला अन्न व्यवसाय परवाना उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. सुमारे दोन हजार लोकांच्या भोजन व्यवस्थेचे कंत्राट अशा प्रकारे परवान्याशिवाय स्वीकारण्यात आल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनेविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सहायक आयुक्त जगताप यांनी संबंधित केटरर्सला नोटीस बजावून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अन्न व्यवसायाचा आवश्यक परवाना प्राप्त होईपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here