Raids on gambling dens and illicit liquor stills : अहिल्यानगर, श्रीरामपुरात जुगार व गावठी हातभट्टीवर १३ छापे; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Raids on gambling dens and illicit liquor stills : अहिल्यानगर, श्रीरामपुरात जुगार व गावठी हातभट्टीवर १३ छापे; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Raids on gambling dens and illicit liquor stills : अहिल्यानगर, श्रीरामपुरात जुगार व गावठी हातभट्टीवर १३ छापे; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Raids on gambling dens and illicit liquor stills : नगर : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) सोमवारी (ता. २८) मोठी कारवाई केली. अहिल्यानगर शहरातील कोतवाली (Kotwali Police Station) तसेच श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार व गावठी हातभट्टीच्या ठिकाणी एकाच दिवशी तब्बल १३ छापे (Raids on gambling dens and illicit liquor stills) टाकण्यात आले. या कारवाईत १३ गुन्हे दाखल करून एकूण १८ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पथके तयार केली. या पथकांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई (Raids on gambling dens and illicit liquor stills)

त्यानुसार पथकाने कोतवाली, श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार व गावठी हातभट्टी सुरू असलेल्या ठिकाणांची माहिती घेतली. त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे चार गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच हद्दीत गावठी हातभट्टीवर कारवाई करत एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे सहा गुन्हे दाखल करून ७ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे दोन गुन्हे दाखल करून २ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली. पथकात गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, पंकज व्यवहारे, सतीष भवर, अतुल लोटके, अभिजीत अरकल, रमीजराजा आतार आणि आजिनाथ पाखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.