Accused who Snatched Mangalsutra Arrested : शिर्डीत महिलेचे मंगळसूत्र लुटणारा आरोपी जेरबंद; ५ लाख ७२ हजारांचे सोने जप्त

Accused who Snatched Mangalsutra Arrested : शिर्डीत महिलेचे मंगळसूत्र लुटणारा आरोपी जेरबंद; ५ लाख ७२ हजारांचे सोने जप्त

0
Accused who Snatched Mangalsutra Arrested : शिर्डीत महिलेचे मंगळसूत्र लुटणारा आरोपी जेरबंद; ५ लाख ७२ हजारांचे सोने जप्त
Accused who Snatched Mangalsutra Arrested : शिर्डीत महिलेचे मंगळसूत्र लुटणारा आरोपी जेरबंद; ५ लाख ७२ हजारांचे सोने जप्त

Accused who Snatched Mangalsutra Arrested : नगर : शिर्डी बसस्थानकाकडे जाणाऱ्या महिला भाविकाच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने लुटणाऱ्या आरोपीला (Accused who Snatched Mangalsutra Arrested) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) ताब्यात घेतले आहे. लखन विजय काळे (वय २३, रा. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चौकशीत दोन जबरी चोरीचे (Robbery) गुन्हे उघडकीस आले असून, या गुन्ह्यांतील सुमारे ५ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ४४ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

शिर्डी बसस्थानकाकडे जाताना मंगळसूत्र हिसकावले होते

१८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आंध्र प्रदेशातील अनुराधा व्यंकटासुब्रमण्यम चेबुरी (वय ५६) या शिर्डी बसस्थानकाकडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आणखी एका जबरी चोरीची कबुली (Accused who Snatched Mangalsutra Arrested)

तपासादरम्यान हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी लखन काळे याने साथीदारासह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला शेवगाव येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शिर्डीतील चोरीचा गुन्हा साथीदार अनिल पेन्टायन टेके याच्यासह दुचाकीवरून केल्याची माहिती दिली. टेके हा सध्या फरार आहे. चौकशीत काळे याने आणखी एका जबरी चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने अजय पिराजी पवार याच्यासह सुमारे आठ महिन्यांपूर्वी घोटण (ता. शेवगाव) परिसरातील शेतात काम करणाऱ्या महिलेचे सोन्याचे दागिने जबरीने चोरल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे शेवगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे. अजय पवार हा फरार आहे.

दोन्ही गुन्ह्यांत चोरी केलेले दागिने शेवगाव येथील एका सोनाराला विकल्याची माहिती लखन काळे याने पोलिसांना दिली. त्यानंतर संबंधित सोनाराला तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत सोनाराकडून ४० ग्रॅम वजनाची ५ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड आणि ४ ग्रॅम वजनाची ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची लगड, असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपीला जप्त मुद्देमालासह शिर्डी पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. लखन काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यांत चोरी, घरफोडी आदी स्वरूपाचे यापूर्वी १० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब खेडकर, फुरकान शेख, प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांच्या पथकाने केली.