State Cabinet Dicision : निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

0
State Cabinet Dicision : निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

नगर : दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet Dicision) बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. तांत्रिक निकषांमुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष बाब म्हणून ज्या तालुक्यांचे पीक करपले आहे, मात्र ते निकषात बसत नाहीत, तिथे प्रत्यक्ष जमीन पाहणी करून त्यांना दुष्काळाचे सर्व फायदे देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

नक्की वाचा : ‘वंशाचा दिवा’ नव्हे, विचारांची मशाल! श्रीगोंद्यात आईच्या पार्थिवाला मुलींचा खांदा

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्देश (State Cabinet Dicision)

१. दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती बैठक नियमित घ्या, तसेच मंत्र्यांनी आपल्या सूचना नियमितपणे या उपसमितीकडे द्याव्यात.

 २. जे तालुके समाविष्ट झालेले नाहीत, त्याबाबत अन्य निकष लावून मदतीबाबत प्रस्ताव सादर करावा.

३.  पाणीवापर कसा करायचा याचा स्वयंस्पष्ट GR काढा, पिण्याचे पाणी गृहीत धरताना त्यात जनावरांचे पाणी समाविष्ट करा आणि नंतर इतर प्राधान्यक्रम ठरवा.

४. डीपीडीसीमध्ये अधिकाधिक कामे ही दुष्काळ निवारणाची घ्या!

५. पालकमंत्र्यांनी कल्पकतेने स्थानिक स्तरावर काय निर्णय घेता येईल, यावर लक्ष द्यावे.

६.  विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका.

अवश्य वाचा : जामखेडच्या कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्…,बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या

‘शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही’ (State Cabinet Dicision)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “दुष्काळाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांनी काही त्या विभागातले तालुके हे पीक करपलं तरी ट्रिगर वनच्या निकषात बसलेले नाहीत, त्यांनाही मदत करण्याची मागणी केली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने असा निर्णय केला आहे की, असे जे तालुके आहेत, या ठिकाणी ट्रिगर टू मधले काही निकष असतील, आणि त्या देखील निकषात ते बसत नसतील, कारण यावेळेस विचित्र परिस्थिती झाली आहे. पहिल्या दोन महिन्यात खूप पाऊस आहे आणि नंतरच्या दोन महिन्यात पाऊस नाही अशी स्थिती कधी होत नाही,असं त्यांनी म्हटलं आहे.