Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची घेतली निवड चाचणी

Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची घेतली निवड चाचणी

0

Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip : अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील (Zilla Parishad School) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, विज्ञान व संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि अंतराळ क्षेत्रातील विविध संधींची ओळख व्हावी यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभागा (प्राथमिक) वतीने डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) थुंबा, केरळ शैक्षणिक सहल २०२६-२७ (Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip) साठीची तालुकास्तर निवड चाचणी रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी यशस्वीरी्या पार पडली.

Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची घेतली निवड चाचणी
Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची घेतली निवड चाचणी

८,०१४ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ३६ परीक्षा केंद्रांवर सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण नोंदणी केलेल्या ८,१४९ विद्यार्थ्यांपैकी ८,०१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

परीक्षेचे स्वरूप व उपस्थिती (Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip)

• गुण व प्रश्न: तालुकास्तरावरील ही निवड चाचणी १०० प्रश्नांची व २०० गुणांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ (MCQ) स्वरूपाची होती.

• पारदर्शक तपासणी: या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची (OMR) तपासणी पूर्णपणे संगणकीय पद्धतीने केली जाणार आहे.

• इयत्तानिहाय उपस्थितीचा तपशील:

• इयत्ता ५ वी: ३,०८८ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी ३,०३१ उपस्थित.

• इयत्ता ६ वी: २,५६२ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २,५२१ उपस्थित.

• इयत्ता ७ वी व ८ वी: २,४९९ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २,४६२ विद्यार्थी उपस्थित होते.

Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची घेतली निवड चाचणी
Dr. Vikram Sarabhai Space Centre educational trip : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची घेतली निवड चाचणी

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अशी असेल पुढील निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

• अंतरिम उत्तरसूची (Answer Key): या चाचणीची अंतरिम उत्तरसूची ५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

• जिल्हास्तर पात्रता: तालुकास्तरीय परीक्षेत प्रत्येक इयत्तेतील गुणानुक्रमे प्रथम ५ विद्यार्थी जिल्हास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरतील.

• जिल्हास्तरीय निवड चाचणी: ही परीक्षा १८ ऑक्टोबर २०२६ रोजी घेतली जाईल.

• अंतिम निवड: जिल्हास्तरीय परीक्षेतून प्रत्येक तालुक्यातून इयत्तानिहाय प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ३ विद्यार्थ्यांची, अशी एकूण ४२ विद्यार्थ्यांची केरळ सहलीसाठी अंतिम निवड केली जाईल.

• पालकांचे हमीपत्र: निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सहलीबाबतचे हमीपत्र २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर सादर करायचे आहे. (टीप: यापूर्वी या सहलीचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना २०२६-२७ मध्ये पुन्हा संधी मिळणार नाही.)

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

“भंडारी साहेब आणि पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हा खेडेगावातील मुलांनाही अभ्यास करून मोफत शैक्षणिक सहलीला जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याबद्दल मी प्रशासनाची खूप आभारी आहे.” — तनुजा धनवटे (जि.प. प्राथमिक शाळा नपावाडी, ता. राहाता)

“अहिल्यानगर जिल्हा परिषदेने सर्व शाळांमधील मुलांसाठी ही चाचणी आयोजित केली. अशा मोठ्या परीक्षेला बसण्याचा अधिकार आणि संधी आम्हाला मिळाली, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.” — सार्थक लोणारे (जि.प. प्राथमिक शाळा एकरुखे)