
Parents arrested in connection with young man’s murder : नगर : दारूच्या नशेत घरी येऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून मुलाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू (Parents arrested in connection with young man’s murder) झाल्याचा धक्कादायक प्रकार गुणवडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे समोर आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह (Dead body) गोणीत भरून शेतात नेऊन जाळल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे.
शेततळ्यात मनुष्यसदृश जळालेले अवशेष आढळली
प्रविण प्रकाश लांडगे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी नगर तालुका पोलिस ठाण्याचे पथक रुईछत्तीसी बीट हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी गुणवडी गावच्या शिवारातील एका शेततळ्यात मनुष्यसदृश जळालेले अवशेष आणि हाडे आढळून आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आई-वडिलांना मारहाण केल्याचा आरोप (Parents arrested in connection with young man’s murder)
पोलिस पथकाने गुणवडी येथील गट क्रमांक १५१ मधील शेतात जाऊन पाहणी केली असता, एका छोट्या कोरड्या शेततळ्यात काही दिवसांपूर्वी जाळण्यात आलेले अवशेष आणि जळालेली हाडे आढळून आली. यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता, प्रविण हा स्पष्टपणे बोलू शकत नव्हता आणि त्याचे आई-वडिलांशी वारंवार वाद होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी प्रविणचे वडील प्रकाश लांडगे आणि आईकडे चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी काहीही माहिती दिली नाही. मात्र, अधिक चौकशीदरम्यान प्रकाश लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास प्रविण दारूच्या नशेत घरी आला होता. त्यावेळी घरातील भांडी फेकून देण्यासह आई-वडिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर झालेल्या वादातून वडील प्रकाश लांडगे यांनी पडवीतील लाकडी दांडक्याने प्रविणच्या डोक्यात मारल्याचे पोलिस तपासात समोर आले.
मारहाणीनंतर प्रविण बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी रात्री प्रकाश लांडगे आणि त्यांच्या पत्नीने मृतदेह गोणीत भरून दुचाकीवरून गुणवडी शिवारातील गट क्रमांक १५१ मधील शेतात नेला. तेथे सरपणाच्या सहाय्याने मृतदेह जाळून टाकल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी नगर तालुका पोलिसांना गुणवडी शिवारातील एका कोरड्या शेततळ्यात मानवी अवशेष व जळालेली हाडे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता जळालेली हाडे आढळून आली. त्यानंतर केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी प्रकाश विनायक लांडगे आणि मीना प्रकाश लांडगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब झावरे, शरद वांढेकर, मंगेश खरमाळे, राहुल थोरात आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने केली.


