Legal Awareness : अहिल्यानगर येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन

मुलांनी वृद्ध आई- वडिलांची काळजी घेणे हे केवळ नैतिक कर्तव्य नाही तर कायदेशीर जबाबदारी - न्यायाधीश महेश जोशी

0
Legal Awareness : अहिल्यानगर येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन
Legal Awareness : अहिल्यानगर येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन

Legal Awareness : नगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, (District Legal Services Authority) अहमदनगर, आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि कै. देशपांडे काका ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त (International Day of Older Persons) कायदेविषयक जनजागृती (Legal Awareness) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर येथे पार पडला.

नक्की वाचा : बहिणीला मारहाण केल्याच्या रागातून दाजीवर चाकूने वार; दोन महिलांसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

Legal Awareness : अहिल्यानगर येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन
Legal Awareness : अहिल्यानगर येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन

जेष्ठ नागरिकांना विविध विषयावर मार्गदर्शन

या कार्यक्रमास जेष्ठ नागरिकांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यक्रम प्रसंगी बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.महेश जोशी यांनी  सांगीतले की, आपल्या कायद्याने देखील जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची दखल घेतलीअसून वृद्ध आई-वडिलांचा संभाळ करणे ही केवळ संस्कृतीने शिकवलेली कर्तव्य नाही तर ती कायद्याने मान्य केलेली जबाबदारी देखील आहे असे प्रतिपादन केले. तसेच सायबर सेक्युरिटी या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की आज आपल्या हातातील मोबाईल हा केवळ फोन राहिलेला नाही. त्यामध्ये आपले बँक खाते, फोटो, संपर्क, व्हाट्सअप फेसबुक आणि अनेक वैयक्तिक गोष्टी आहेत त्यामुळे आजच्या काळात घराला कुलूप लावण्याइतकेच मोबाईलला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सायबर गुन्हेगार विशेषता भीती, लोभ आणि घाई या तीन गोष्टींचा फायदा घेतात. त्यामुळे आपण OTP आणि PIN कधीही शेअर करू नका: बँक अधिकारी, पोलीस किंवा कोणताही व्यक्ती फोनवरून OTP, UPI, PIN किंवा कार्ड डिटेल्स मागत असेल, तर ते कधीही सांगू नका. जर तुमच्यासोबत कोणताही सायबर फ्रॉड झाला, तर तत्काळ १९३० या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा. कायदेशीर तरतुदी: DAWN स्कीम – २०२५’ बाबत उपस्थित जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारचे कायदेविषयक सहाय्याची अवश्यकता असल्यास तत्काळ १५१०० या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करु शकता असे सांगितले.

ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे व संरक्षणाचे महत्त्व पटवून देताना पॅनल विधीज्ञ ॲड. राजाभाऊ शिर्के यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार आणि ‘सिनियर सिटीझन ॲक्ट – २००७’ या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांच्या माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हातारदेव वायकर आणि  देशपांडे काका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पॅनल विधीज्ञ ॲड. पिंटु पाटोळे यांनी  केले. या कायदेविषयक शिबिरास परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.