
Pathardi Police : पाथर्डी : बहिणीला मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या दाजीवर संतापलेल्या मेव्हण्याने पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempted murder) केल्याची घटना शनिवारी (ता.३) सायंकाळी सातच्या सुमारास कुरणतांडा, धामणगाव देवी परिसरात घडली. या घटनेत सतीश अश्रू राठोड (वय ३९, रा. कुरणतांडा, धामणगाव देवी, ता. पाथर्डी) हे गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. या प्रकरणी दोन महिलांसह तिघांना पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा : पॉवरलिफ्टिंगमध्ये अनेक पदकांची कमाई करणाऱ्या डॉ. युती धुमकेकर ‘प्रवरा क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मानित!
राठोड यांच्याशी वाद
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश राठोड हे आपल्या पत्नीला नियमित मारहाण व शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून त्यांचा मेव्हणा संजय तुकाराम चव्हाण (वय ३५, रा. हरीचा तांडा, ता. पाथर्डी) याचा राठोड यांच्याशी वाद झाला. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संतापलेल्या चव्हाण याने राठोड यांच्या पोटात चाकू खुपसल्याचे सांगण्यात आले. चाकूच्या वारामुळे राठोड गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर राठोड याच्या पोटात असलेला चाकू डॉक्टरांनी तो बाहेर काढला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाथर्डी पोलिसांकडून तपास सुरू (Pathardi Police)
प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन कंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, गणेश सायकर आदींनी घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, जखमी राठोड यांच्या आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री फिर्याद देण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संजय चव्हाण याच्यासह दोन महिलांना ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण, हल्ल्यातील इतरांची भूमिका आणि कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी याबाबत पाथर्डी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


